शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना नजर लोकसभेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:53 IST

नव्या घोषणांची अपेक्षा फोल : जुन्याच योजनांच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चार महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना नवीन योजना जाहीर करण्याऐवजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साडेचार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा सादर केला.

आगामी चार महिन्यांसाठीच्या खर्चाची तरतूद करणे हाच मुख्यत्वे आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचा (लेखानुदान) हेतू होता. त्या निमित्ताने मुनगंटीवार नवीन काही योजनांची घोषणा करतील, ही अपेक्षा फोल ठरली. शेतकरी आणि गरिबांचा राज्याच्या तिजोरीवर पहिला आणि शेवटचा हक्क आहे, अशी भावनिक पेरणी मुनगंटीवारांच्या भाषणात होती. ‘देशभरातच वाहू लागले प्रगतीचे वारे, या प्रगतीने जगी तळपला अपुला भारत देश, या वेगाला पुन्हा देवू महाराष्ट्राची साद, हिमालयाला जणू लाभावी सह्याद्रीची साथ’ अशी कविताही त्यांनी सादर केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. पण त्याचा उल्लेखही मुनगंटीवार यांच्या भाषणात नव्हता.यापूर्वी मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करीत तेव्हा शिवसेनेकडून फारशी बाके वाजविली जात नसत. आज मात्र चित्र वेगळे होते. सरकारची महत्त्वाची उपलब्धी मुनगंटीवार यांनी नमूद केली की युतीतील दोन्ही पक्षांचे सदस्य त्याचे स्वागत करीत होते.

सिद्धीविनायकाचे दर्शनवित्त मंत्री मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सकाळी सिद्धीविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेतले. तर ते अर्थसंकल्प सादर करीत असताना त्यांची पत्नी, कन्या आणि होणारे जावई प्रेक्षक दीर्घेत बसून होते. भाजपाच्या खा. प्रीतम मुंडेदेखील आल्या होत्या.

तुमच्या शिक्षकाची भेट झालीमध्यंतरी तुमचे एक शिक्षक मला भेटले. एकच गोष्ट तुम्हाला दोनदोन वेळा समजावून सांगावी लागते असे मला ते सांगत होते. त्यामुळे मी काही आकडेवारीचा पुनरुच्चार करतोय. तसेही तुम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी बाकावरच बसायचे आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना हाणला. त्यावर सभागृहात हशा पिकला. ‘पुन्हा तीच आकडेवारी सांगताय’ असा चिमटा पाटील यांनी मुनगंटीवार यांना काढला होता.विकासयात्रा अखंडित राखणारशेती-सिंचन, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे. शेतकरी, मजूर, महिला, बालके आणि वंचित-उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने गेल्या चार वर्षात सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना-उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली गेली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

भाजप-शिवसेना सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प दुष्काळग्रस्तांना नैराश्याच्या खाईत ढकलणारा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपए आर्थिक मदत देण्याची गरज होती. खरीप २०१८ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची आवश्यकता होती. परंतु, यासंदर्भात सरकारने काहीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. सरकारच्या कामात जोर नसल्यामुळे अर्थमंत्र्यांना आवाजात उसना जोर आणावा लागला.

- राधाकृष्ण विखे, विरोधीपक्षनेते, विधानसभा

टॅग्स :Maharashtra Budget 2019महाराष्ट्र बजेट 2019