शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

व्हीप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळले; 14 आमदारांना गोगावलेंच्या सांगण्यावरून नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 21:34 IST

Vidhan Sabha Floor Test: व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 14 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Floor Test: आज विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. काल भाजपने अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली तर आज विश्वासदर्शक ठरावातही बाजी मारली. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, आता शिवसेना शिंदे गट व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 14 आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

आदित्य ठाकरेंना वगळले

आमचा व्हीप झुगारणाऱ्या सर्व आमदारांना आम्ही अपात्र ठरवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही, असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. व्हिपचे पालन न केल्यामुळे भरत गोगावलेंची विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या इतर 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या आमदारांवर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

कारवाई होणार- मुख्यमंत्रीदरम्यान, शिवसेनेच्या त्या 14 आमदारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिली आहेत. आमच्याकडे शिवसेनेचे एकूण 40 आमदार झाले आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहे. व्हिपचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

आमचा व्हीप खरा- आदित्य ठाकरेएकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा सत्तासंघर्ष अद्याप शमलेला नाही. शिवसेना कोणाची हा प्रश्न अजूनही कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरु आहे. दरम्यान, शिवसेना संपणार नाही, आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु, असंही आदित्य म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा