शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात ‘फ्लोअर मॅनेजमेंट’चे आव्हान; मंत्र्यांना करावा लागेल होमवर्क, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 06:47 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या ४० ते ४५ दिवस आधी आमदारांना  लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्यानुसार आमदार प्रश्न पाठवतात.

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळात खातेवाटप आणि खातेबदल झाल्याने अनेक मंत्र्यांची तारांबळ उडणार आहे. 

अधिवेशनात आपल्या खात्यावरील प्रश्नाला मंत्र्यांना उत्तर द्यावे लागते. अनेक मंत्र्यांची खाती बदलल्याने या मंत्र्यांना तयारी करायलाही वेळ मिळणार नाही. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्र्यांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच विरोधकांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे प्रश्न वगळलेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून या मंत्र्यांचे प्रश्न वगळण्यात आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या ४० ते ४५ दिवस आधी आमदारांना  लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्यानुसार आमदार प्रश्न पाठवतात. मात्र, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,  धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांचे प्रश्न आता वगळण्यात आले आहेत. तसेच इतर आमदारांच्या  प्रश्न सूचनेबाबत वरील  नावे जोडण्यात आली असतील तर ती वगळण्यात यावीत, असे विधान मंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्यमंत्र्यांविना मंत्रिमंडळया मंत्रिमंडळात सगळे २९ मंत्री कॅबिनेट आहेत. एकही राज्यमंत्री नाही. कॅबिनेटमंत्री एका सभागृहात बसून दुसऱ्या सभागृहात राज्यमंत्र्यांना पाठवतात. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचे कामकाज अडत नाही. मात्र, यावेळी कॅबिनेटमंत्र्यांना ही अडचण येऊ शकते. फ्लोअर मॅनेजमेंट करताना सत्तापक्षाची कसरत होऊ शकते.

अधिवेशनात काय होणार?मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्याकडील खाती अधिवेशनापुरती सहकारी मंत्र्यांना वाटून देतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सगळ्या खात्यांची उत्तरे देतात. कार्यबाहुल्यामुळे शिंदे याहीवेळी काही खाती अधिवेशनात उत्तरे देण्यापुरती सहकाऱ्यांना देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन