शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
2
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
3
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
4
आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात किती आहे नवे दर?
5
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
6
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
7
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
8
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
9
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
10
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
11
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
12
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
13
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
14
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
15
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
16
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
17
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
18
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
19
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
20
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

VIDEO : नागपुरातील वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह

By admin | Updated: July 10, 2017 14:11 IST

वेणा जलाशयात बोट उलटण्यापूर्वी तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्यानं रविवारी 11 तरुण बुडाले आहेत. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. यात दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. राहुल जाधव, अंकीत भोस्कर, परेश कटीके, रोशन खांदारे आणि अक्षय खांदारे या पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत.  
 
तर अतुल भोयर, पंकज डोईफोडे आणि प्रतिक आमडे हे तीन जण अजून बेपत्ता आहेत.  दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. सहलीचा कसा आनंद घेत आहेत याची माहिती बोटीतील हे तरुण फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्रांना सांगत होते.  यावेळी काही जणांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. शिवाय, एवढे जण एका बोटीत कसे बसले आहात, असा प्रश्न उपस्थित करत भीतीदेखील व्यक्त केली होती. 
 
काही वेळानं ही बोट उलटून दुर्घटना घडली ज्यात 11 जण बुडाले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी (9 जुलै) संध्याकाळी ही दुर्घटना घडल्यानं अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.  
 
आणखी बातम्या वाचा 
(वेणा जलाशयात नाव उलटून 7 तरुण बुडाले)
("शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत")
(दलित मुलींना मंदिरप्रवेश न देणा-या पुजा-यासहीत 3 जणांविरोधात गुन्हा)
नेमकी काय आहे घटना ?
अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी संध्याकाळी सहलीसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणं जिवावर बेतले आहे. बोटीतून प्रवास करताना एकाच बाजूला अधिक भार झाल्यामुळे डोंगा असंतुलित होऊन उलटली. परिणामी 7 जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. या नावेत नाविकांसहीत एकूण 11 जण होते.  
 
कळमेश्वर पोलिसांना या दुर्घटनेची माहिती तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळाली. पण त्यांनी लागलीच बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रात्री 9.30 वाजेपर्यंत तीन जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. 
 
कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधोमध गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली. अतुल बावणे याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता इतर 10 जण जलाशयात बुडाले.
 
शोधकार्य सुरू 
अतुल काठावर आल्यानंतर त्याने इतरांना नाव उलटून तरुण बुडाल्याची माहिती दिली. अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या ताफ्याकडून रात्रीपासून शोधकार्य सुरू आहे.