शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

Video: रणरणत्या उन्हात गोसावी समाजाचा संसार!

By admin | Updated: April 18, 2017 17:27 IST

ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 18 - विविध मागण्यांसाठी भटके गोसावी समाजाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडून अनोखे आंदोलन केले. ...

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 18 - विविध मागण्यांसाठी भटके गोसावी समाजाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडून अनोखे आंदोलन केले. भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे उदय घाडगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. भविष्यात समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा या समाजाने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.गोसावी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुटुंबासह रणरणत्या उन्हात आंदोलनास बसले होते. लहान मुले हात वर करून उन्हाचे चटके सोसत आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत होते. काही महिला लहान मुले मांडीवर घेऊन बसल्या होत्या. उन्हातच त्यांनी चूल मांडून स्वयंपाक सुरू केला. उन्हाचा तडाखा वाढत होता; पण आंदोलक जागेवरून हटले नाहीत. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सावलीचा आधार घेतला; मात्र आंदोलक महिला व लहान मुलांनी जागा सोडली नाही. त्यांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याच ठिकाणी अवजड वाहतूक सेनेचा मोर्चा असल्याने भटके गोसावी समाजाला आंदोलनास जागाच मिळाली नाही. परिणामी त्यांना दिवसभर उन्हात बसून आंदोलन करावे लागले.समाजासाठी अ‍ॅट्रॉसिटीसारख्या कडक कायद्याची तरतूद करावी, व्यवसायासाठी कोणत्याही बँकेत कर्ज देण्याची सोय करावी, समाजाला निवडणूक लढविण्यासाठी कायद्यात बदल करावा, उदरनिर्वाहासाठी शेतजमिनी कसून खाण्यासाठी द्याव्यात, मुलांच्या शिक्षणासाठी अनुदान द्यावे, महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी जाचक अटी लाऊ नयेत, अनेक गावांत हा समाज स्थायिक झाला आहे, त्यामुळे जागा व घरे बांधून मिळावीत, दारिद्र्यरेषेखालील यादीत नावे समाविष्ट करावीत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला आंदोलन सादर करण्यात आले.या आंदोलनात नीलाबाई घाडगे, कांचन गोसावी, सरस्वती चौगुले, गंगा घाडगे, उज्वला माळी, रामदास भोसले, सुवर्णा जाधव, शेवंता घाडगे, सागर टेंभूगडे, विजय सावंत, विजय जाधव, उज्वला माळी आदी सहभागी झाले होते.

 

https://www.dailymotion.com/video/x844vsz