शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- आश्चर्य ! त्याने मारल्या एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या

By admin | Updated: March 26, 2017 17:57 IST

जामखेड येथील आठ वर्षे वयाच्या प्रतीक नागरगोजेने एका मिनिटात दोरीवरील 240 उड्या मारण्याचे रेकॉर्ड केले आहेत

ऑनलाइन लोकमत/अशोक निमोणकरअहमदनगर, दि़ 26 - जामखेड येथील आठ वर्षे वयाच्या प्रतीक नागरगोजेने एका मिनिटात दोरीवरील 240 उड्या मारण्याचे रेकॉर्ड केले आहेत. या रेकॉर्डची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डनेही दखल घेतली आहे. प्रतीक हा आठ वर्षे वयाचा असून, तो इयत्ता दुसरीमध्ये लोकमान्य शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहे. त्याची उंची कमी असल्याने उंची वाढवण्यासाठी त्याची आई ज्योती नागरगोजे या त्याला रोज सकाळी दोरीवरील उड्या मारायला लावत असत. त्याचा उड्या मारण्याचा वेग हळूहळू वाढू लागला, हे त्याच्या पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला.लिम्का बुक, वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड आणि गिनीज रेकॉर्डमध्ये प्रतीकच्या कामगिरीची दखल होण्यासाठी प्रतीकच्या पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत. वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड बुकने प्रतीकच्या कामगिरीची दखल घेतली असून, वर्ल्ड इंडियाच्या रेकॉर्डमध्ये प्रतीकचे नाव नोंदविण्यात आले आहे.4 मार्च 2017 रोजी वर्ल्ड इंडिया रेकॉर्डकडून प्रतीक एका मिनिटात 240 दोरीवरील उड्या मारतो की नाही, याची शहानिशा करून या कामगिरीची वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.  हे यश संपादन करण्यासाठी त्याला आई ज्योती, वडील परशुराम, एलआयसीचे विकास अधिकारी विनायक सर्जे, लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात, नागेश विद्यालयचे हजारे, जिल्हा तायक्वाँदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांचे मार्गदर्शन लाभले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये त्याच्या कामगिरीची नोंद होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीकचे वडील परशुराम नागरगोजे यांनी सांगितले आहे.