शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 09:47 IST

विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ, सत्ताधारी आमदारांनी हजेरी लावली होती. त्यातच या कार्यक्रमात घडलेल्या एका प्रसंगाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

ही चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील संवादाची...चहापानाच्या कार्यक्रमावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात या दोघांमधील संवाद कैद झाला. त्यावेळी शिंदे यांच्या चेहऱ्यावरील रागही कॅमेऱ्यात टिपला गेला. एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना आता मला काय विचारताय तुम्ही असा संतापून सवाल केला. हे विधान कॅमेऱ्यात रॅकोर्ड झाले. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणत्या विषयावर होता हे समोर आले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचा त्रागा पाहता ते रागावून बावनकुळेंना प्रश्न करत असल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंदी सक्ती मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांची कोंडी?

मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्ती यावरून बराच गदारोळ माजला. राज्यात पहिलीच्या वर्गापासून मुलांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा हा निर्णय होता. परंतु या निर्णयाला मोठ्या प्रमाणात मराठी भाषा प्रेमी लोकांकडून तीव्र विरोध झाला. या मुद्द्यामुळे महायुती सरकारला लोकांचा आक्रोश सहन करावा लागला. त्यात ज्या विभागाने हा निर्णय घेतला तो शालेय शिक्षण विभाग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत असं म्हणणाऱ्या शिंदेसेनेला हिंदी सक्ती वादावर ठाम भूमिका घेता आले नाही. मात्र त्याचवेळी सरकारमध्ये राहून अजित पवारांनी हिंदी सक्तीवर पहिली ते चौथी हिंदी नको, शिकवायची असेल तर पाचवीपासून शिकवा अशी भूमिका मांडली. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यावर जन्म झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना जी शिंदेकडे असल्याचा दावा केला जातो. त्यांची या मुद्द्यावरून अडचण झाल्याचे दिसून आले. 

हिंदी सक्ती GR मागे

दरम्यान, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस