शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

VIDEO - अशीही अंधश्रध्दा...झाडातून आलेल्या चिकाला बनवले देव

By admin | Updated: August 25, 2016 17:45 IST

निंबाच्या झाडामधून पांढरे द्रव्य बाहेर येत असतानाचे पाहून काही युवकांनी एकमेकांना सांगितल्याने ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.

शंकर वाघ / शिरपूर जैनवाशिम, दि. 25 - जैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या शिरपूर जैन नजिक वाघी रस्त्यावरील मरीमाया माता मंदिराजवळील निंबाच्या झाडामधून पांढरे द्रव्य बाहेर येत असतानाचे पाहून काही युवकांनी एकमेकांना सांगितल्याने ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. अन लगेचच नागरिकांनी तेथे येवून झाडाची पूजा, अर्चा सुरु करुन प्रसाद वाटपासह चमत्कार घडल्याचे बोलणे सुरु केल्याने गणपती दुध पिल्याच्या घटनेची आठवण करुन दिली.

कृषी तज्ञ व अभ्यासकांच्या मते लिंबाच्या झाडामध्ये ह्यलिनोलिक अ‍ॅसिडह्ण नावाचा घटक असतो. तो कधी-मधी बाहेर पडतो तर काहींच्या मते अ‍ॅझरडीनरॅसिटन नावाचा घटक निंबाच्या झाडामध्ये असतो. तो झाडाच्या पानातून , सालीतून बाहेर काढता येतो. यापासून चांगले किटकनाशकही बनते. झाडाला जखम झाल्यास त्यातून हे द्रव्य बाहेर पडते. एखादया पक्षाने चोचीने झाडाची साल पोखरल्यासही असे द्रव्य बाहेर पडू शकते. असे असतांना मरीमाय माता मंदिरात दर्शनाकरिता आलेल्या एका भाविकाला २५ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ४० फूट उंच असलेल्या निबांच्या झाडातून पांढरे द्रव्य दिसताचं त्याने चमत्कार झाला असे भासवून सर्वत्र वाऱ्यासारखी बाब पसरवली.

लगेचच भाविकांची गर्दी निर्माण होवून लोकांनी हार, फुले घेवून तेथे प्रसाद वाटपासही सुरुवात केल्याने अंधश्रध्देला खतपाणी देण्यात येत आहे. भाविकांची श्रध्दा असली तरी त्यामागचे शास्त्रीय कारणाचा शोध घेणे गरजेचे होत आहे. येथे काही श्रध्दने तर काहींनी कुतूहलाने गर्दी केली होती.