शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी रांगा

By admin | Updated: May 14, 2017 21:00 IST

शनिवार व रविवार सलग सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरात रविवारी गर्दी ओसंडून वाहत होती.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 14 - शनिवार व रविवार सलग सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरात रविवारी गर्दी ओसंडून वाहत होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दर्शनरांगा अक्षरश: ओसंडून वाहत होत्या. शाळांचे निकाल लागून उन्हाळी सुटी सुरू झाल्याने शहरवासीयच नव्हे, तर राज्यांसह परराज्यांतील भाविकांनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजल्यापासून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे गर्दीने फुलून गेले होते आलेल्या भाविकांच्या चारचाकींमुळे तर दुपारनंतर बिंदू चौक येथील पार्किंग फुल्ल झाल्याने वाहनांच्या गर्दीमुळे वाहने भाऊसिंगजी रोड व बिंदू चौकात थांबून होती. विद्यापीठ हायस्कूल, सरस्वती चित्रमंदिर, साकोली कॉर्नर, शिवाजी रोड आदी ठिकाणी वाहने पार्किंग करण्यात आली होती. परराज्यांसह राज्यातील भाविक रविवारचा सुटीचा दिवस म्हणून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने खासगी व स्वत:च्या वाहनाने कोल्हापुरात दाखल झाले होते. पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत गर्दी केली होती. भवानी मंडप, महाद्वार रोड, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौक, शिवाजी चौक आदी परिसरात भाविक रस्त्यावरील वस्तू खरेदी करताना दिसत होते. दुपारनंतर दर्शनरांगेत उभारणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. उन्हाळी सुटीमुळे यात्री निवास, लॉज, खासगी घरे, धर्मशाळा आदी भाविकांनी फुल्ल झाली होती. परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसत होती. रविवारी दिवसभरात लाखो भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. भवानी मंडप येथे पहाटेपासूनच करवंदे, जांभळे, फणसाचे गरे आदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मलकापूर, आंबा आदी परिसरातील महिला विक्रेत्या आल्या होत्या. या रानमेव्याचा आनंद पर्यटक भाविकांनी लुटला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात मंडप घातल्याने बाहेरून आलेल्या भाविकांना आतून फिरताना उन्हाचे चटके जाणवले नाहीत. त्यामुळे या व्यवस्थेचे कौतुक भाविकांनी केले. रात्री गर्दीचा ओघ कमी झाला.