- दिपक होमकर / अमित सूर्यवंशी
ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 22 - बाळे पुलावरुन खासगी आराम बस पळवून नेताना आरोपींना पोलिसांनी पकडल्याचा किस्सा ताजा असताना या घटनेची पुनरावृत्ती उळे-कासेगाव हद्दीत रविवारी रात्री घडली़ कोल्हापूरहून नागपूरकडे जाणारी खुराणा ट्रॅव्हल्स आराम बसच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. सोलापूर- तुळजापूर मार्गावरील तामलवाडीजवळ हा प्रकार रविवारी रात्री घडला. दरम्यान बस पळवून नेणाऱ्या एकास ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलिसांच्या हवाली केले़ विशाल माणिक गोडसे (वय २८, रा. धोत्री, ता. तुळजापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.खुराणा ट्रॅव्हल्सची आराम बस (एम़ एच़ ४०/ए़टी़०१८७) कोल्हापुरातून रविवारी दुपारी तीन वाजता नागपूरसाठी रवाना झाली होती. रात्री साडेनऊच्या दरम्यान सोलापुरातील उळेगाव गावाच्या पुढे हॉटेल अशोका येथे जेवणासाठी थांबली़ गाडीत जवळपास ३० हून अधिक प्रवासी होते़ यापैकी काही झोपेत होते़ त्याचवेळी काही चोरट्यांनी ही गाडी पळवून नेण्याचा डाव आखला. जेवण आटोपल्यानंतर गाडी निघाली आणि दहा मिनिटातच सहा जणांनी गाडी अडवली आणि समोरच्या काचेवर दगड मारुन ती फोडली़ यामध्ये तिघे किरकोळ जखमी झाले. एकाने चालकाला मारहाण करुन त्याला खाली ओढले आणि बसचा ताबा घेतला़ त्याने बस फिरवून उलट उळेगावाजवळ आणली़ येथून धोत्री मार्गे गाडी पुढे नेण्यासाठी उळ्याच्या वळणावर गाडी वळवली़ मात्र वळण लहान असल्याने गाडी वळवता आली नाही़ याचवेळी रोडने येणाऱ्या काही लोकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला़ यावेळी लोकांनी आरडाओरड केली़ कासेगावमधील ग्रामस्थांनी पाठलाग करुन लगेच थोड्या अंतरावर बस पकडली़ बसचा ताबा घेतलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. बस पळविणारा आरोपी विशाल माणिक गोडसे यास अटक करण्यात आली आहे. त्याचे इतर पाच साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. दगड मारल्याने अमित माने (रा. कोल्हापूर), अमर सिंग (रा. नागपूर) हे जखमी झाले आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस तपास करत आहेत. (प्रतिनिधी)सर्व प्रवासी सुखरुपखुराणा ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोचमध्ये कोल्हापूर, सोलापूर येथून नागपूरकडे सुमारे ३० पेक्षा अधिक प्रवासी निघाले होते. चोरांनी गाडी ताब्यात घेतल्यानंतर चालकाला मारहाण केली. मात्र एकाही प्रवाशाला दमदाटी किंवा मारहाण केली नाही. अवघी बसच लांब पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो फसल्याने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.अपहरणाचा दुसरा प्रयत्नशनिवारी बोरीवलीहून हैदराबादकडे निघालेल्या खासगी बस अपहरण करण्याचा प्रयत्न सोलापुरातील बाळेजवळ झाला होता. त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले असताना आज पुन्हा एकदा तुळजापूर रस्त्यावर हा प्रकार घडला. या दोन्ही बसमध्ये उच्चभ्रू आणि श्रीमंत प्रवासी असल्याने त्यांना लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याचे या घटनांवरुन स्पष्ट होते.आरोपीची वैद्यकीय तपासणीपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विशाल माणिक गोडसे (वय २८ ) याला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी तालुका पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात १२.१५ वाजता आणले होते. तपासणीनंतर पुन्हा त्याला पोलीस ठाण्यात नेऊन जबाब नोंदवण्याचे काम सुरु होते.
लसांच्या ताब्यात दिले. बस पळविणारा आरोपी विशाल माणिक गोडसे यास अटक करण्यात आली आहे. त्याचे इतर पाच साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. दगड मारल्याने अमित माने (रा. कोल्हापूर), अमर सिंग (रा. नागपूर) हे जखमी झाले आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस तपास करत आहेत. (प्रतिनिधी)बसच्या मागील काचेवर एकाने दगड मारून दुचाकी गाडी बसला आडवी लावून बस थांबवली. काचेवर दगड मारला. त्यानंतर चालकाला मारहाण केली.- डॉ. सरस्वती चावरे, कोल्हापूर