ऑनलाइन लोकमत -
पंढरपूर, दि. 09 - वारक-यांना ताटकळत ठेवल्यामुळे नव्यानेच मंत्रीपदाची शपथ घेणा-या सुभाष देशमुख यांना वारक-यांची माफी मागावी लागली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी सुभाष देशमुख यांनी माऊलींच्या पालखी मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. धर्मपूरी (ता. माळशिरस) येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेउन त्यांचे स्वागत केले व थेट पंढरपूर गाठले. मात्र मंत्री येणार अशी बातमी आल्यावर दर्शन रांग अर्धा तास थांबविण्यात आली. त्यामुळे चार पाच तास दर्शन रांगेत ताटकळलेल्या भाविकांना पुन्हा अर्धा तास जागेवरच थांबावे लागल्याने भाविक वैतागले. मात्र सुभाष देशमुखांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर लगेच माध्यमांसमोर येवून भाविकांची गैरसोय झाल्याबद्दल माफी मागितली.