शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Video: "MY मराठी" विषय नको गं आई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 22:37 IST

वळवावी तशी वळते असा लौकीक असलेली आपली मराठी भाषा लिहिण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेक जण नाकं मुरडतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला चिमुकल्याचा एक व्हिडीओ

सागर सिरसाट / आॅनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - वळवावी तशी वळते असा लौकीक असलेली आपली मराठी भाषा लिहिण्याची वेळ येते तेव्हा अनेकांची त्रेधा उडते... कोणता शब्द ऱ्हस्व अन् कोणता दिर्घ... कुठे नेमका अनुस्वार... अन्् कुठे ‘न’ कुठे ‘ण’... अशा अनेक धांदल उडवणाऱ्या व्याकरणाने हैराण झालेल्या एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट व्हायला होतं हे खरंय... पण अखेर आपली मातृभाषा मायमराठी आहे की म-हाटी हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. मराठी लिहिताना ऱ्हस्व दीर्घच्या चुकांना कंटाळून रडणारा एक मुलगा दाखवणारा व्हिडीओ गेले दोन-चार दिवस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय. हा चिमुकला कुठला ते कळू शकलं नसलं तरी त्यावरून मराठी भाषेबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे, हे नक्की.महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीची सरकारच्याच विविध विभागांकडून गळचेपी केली जात असल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला येत असतात. निवडणुका आल्या की मराठी भाषेचा जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना पुळका येतो. आपली मातृभाषा असली तरी मराठीला कधी सुगीचे दिवस येणार याबाबत आपण सातत्याने केवळ गळे काढत असतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक चिमुकला मराठीचा अभ्यास करताना दिसतोय, त्याची आई त्याला मराठी शिकवताना दिसतेय. मात्र, तो चिमुकला मराठी भाषेतील काना, मात्रा, अनुस्वार, आदी अर्थातच शुद्धलेखनाला चांगलाच वैतागलेला दिसतोय. मराठीपेक्षा इंग्रजी भारी असं म्हणत मराठी न शिकण्याची एकाहून एक कारणं देताना तो चक्क आई-वडिलांसमोर ढसाढसा रडत हात जोडून विनंतीदेखील करत आहे. व्हिडीओ पाहून एकवेळ या चिमुकल्याचं म्हणणं पटेलही पण त्याचवेळी इंग्रजीच्या स्पेलिंग्ज पाठ करताना आणि करून घेताना घरोघरच्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची उडणारी त्रेधा आपण विसरतो का? मराठी आपण जन्माला आल्यापासून आपसुकच बोलायला लागतो त्यामुळे शुद्धलेखन शिकण्याचा प्रश्नच येत नाही. इंग्रजी शिकताना असं नसतं. ती शिकावीच लागते. त्याचं व्याकरणही जाणून घ्यावंच लागते... असो... भाषा कोणतीही असली तरी व्याकरणाचे नियम जड सगळ्यांना जातातच. तेवढ्यासाठी मराठी भाषेचा कंटाळा, तिटकारा करणं म्हणजे पाय दुखतात म्हणून ते कापून टाकण्यासारखंच आहे.
पाहा व्हिडीओ-