शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

VIDEO- जोतिबाच्या नावानं आसमंत दुमदुमला

By admin | Updated: April 10, 2017 18:29 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 - जोतिबाच्या नावानं चांगभलचा गजर, खोबरे गुलालाची उधळण, दवणाचा मान, मानाच्या शेकडो गगनचुंबी सासनकाठ्यांची ...

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 10 - जोतिबाच्या नावानं चांगभलचा गजर, खोबरे गुलालाची उधळण, दवणाचा मान, मानाच्या शेकडो गगनचुंबी सासनकाठ्यांची लयबद्ध मिरवणूक, हलगी, ताशा, तुतारींच्या तालावर काठीचा तोल सांभाळत देवाच्या भक्तीत लीन होऊन नृत्य करणारे सासनकाठीधारक आणि हा अलौकिक सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या मांदियाळीत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी कजर्मुक्त करण्यासाठी शासनाला बळ दे, असे साकडे घातले.महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा. यानिमित्त सोमवारी पहाटे पाच वाजता तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते श्री जोतिबा देवास अभिषेक करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी अजित पवार, व्यवस्थापक लक्ष्मण डबाणे उपस्थित होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारात त्यांच्या हस्ते निनाम पाडळीच्या मानाच्या पहिल्या सासनकाठीचे व विहे गावच्या दुसऱ्या सासनकाठीचे पूजन झाले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जोतिबा परिसर विकासासाठी ३० कोटीचा आराखडा करण्यात आला असून २५ कोटी शासन आणि ५ कोटी देवस्थान समिती देणार आहे. या आराखड्यानुसार ५ हजार भाविकांची सोय होईल यादृष्टीने सर्व सुविधायुक्त चार मजली दर्शन मंडपाची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण करून पुढील वर्षी हा दर्शन मंडप भाविकांसाठी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली जाईल. जोतिबा ते पन्हाळा रोप वे करण्याचा एक प्रस्ताव आला असून या संदर्भात आवश्यक त्या पूतर्ता आणि अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनास सांगण्यात आले आहे. त्यामुळे रोप वे चा प्रश्नही मार्गी लावला जाईल.महाराष्ट्रात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० हजार कोटीने वाढले. पुढच्या वर्षीही पाऊस चांगला झाला तर उत्पन्न काही हजार कोटीने वाढेल. यासाठी महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबा चरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, सत्यजित पाटील, शंभूराजे देसाई, बाळासाहेब पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, जोतिबाच्या सरपंच डॉ. रिया सांगळे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक एम. बी. तांबडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य बी.एन. पाटील-मुगळीकर, शिवाजी जाधव, प्रमोद पाटील, संगीता खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

https://www.dailymotion.com/video/x844vku