शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

VIDEO - जयगड-मुंबई, राजापूर-मुंबई एसटी बससह किमान 22 प्रवासी बेपत्ता

By admin | Updated: August 3, 2016 18:56 IST

मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल वाहून गेला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा  सावित्री नदीवरचा जुना पुल  वाहून गेला आहे. या दुर्घटनेत त्यावेळी पूलावर असणा-या दोन एसटी बसेस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेली आहेत. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
 
जयगडहून मुंबईला येणारी एमएच - २० - बीएल 1538 आणि राजापूरहून बोरीवली येणारी एमएच - ४० - एन ९७३९ या दोन बसेस वाहून गेल्या आहेत. या दोन्ही बसमध्ये चालक-वाहकासह मिळून एकूण २२ प्रवासी होते. 
जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत. 
 
पुण्या-मुंबईतून एनडीआरएफच्या दोन टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये ४० जवान आहेत. एनडीआरएफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहे. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन नौदल आणि वायूदलाची मदत घेण्यात येणार आहे. हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने शोध कार्य करण्यात येणार आहे. 
 
राजापूर-बोरिवली आणि जयगड - मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी (०२१४१) २२२११८ व टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
 
 
दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांची नावे : 
प्रशांत प्रकाश माने-भांडरपुळे, सुनील महादेव बैकर, स्नेहल सुनील बैकर सतकोंडी, अविनाश सखाराम मालप - कांबळे लावगण, दीपाली कृष्णा बलेकर, अनिष संतोष बलेकर, धोंडू बाबाजी कोकरे
 
जयगड-मुंबई या एसटी बसमधले पाच प्रवासी 
दिपाली पाठकर (२८), भुषण पाठकर (29), )सेन्हा बयकर (30) सुनिल बयकर (32) आनिल बलेकर वय (11)
 

दरम्यान दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.