ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ४ - महाड दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे सांगणाऱ्या पत्रकारांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दमदाटी केली आहे. तुम्हाला काय कळतंय, टीआरपी वाढवण्यासाठी बांबू हातात घेऊन उभे राहता, तुम्ही काय काम केलंयत, आम्ही ४० वर्षे घालवलीत असंही ते दटावण्याची सूरात म्हणताना दिसत आहेत.काल झालेल्या महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या सुविधांबद्दल प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी प्रकाश मेहता म्हणाले की, त्यांच्याबाबतील माझा पक्ष काय ते पाहून घेईल, असे सांगत पत्रकारांवर आगपाखड केली. तसेच, येथे उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांनीही दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणाची प्रतिक्रिया एबीपी माझानं प्रकाश मेहतांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्यांचा उद्धटपणा कायम दिसून आला. कारण, पत्रकारानं असा काय प्रश्न तुम्हाला विचारला होता की, तुमचा पारा एवढा चढला? असं विचारलं असता यावेळीही त्यांनी कोणतेही फालतू प्रश्न विचारत होते. मी फालतू प्रश्नांना उत्तरं देत नाही. काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, असे सांगितले.
VIDEO : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी केली पत्रकारांवर आगपाखड
By admin | Updated: August 4, 2016 19:29 IST