शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - परिट समाजाच्यावतीने कपडे धुने आंदोलन!

By admin | Updated: September 19, 2016 17:05 IST

परिट समाजाच्यावतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १९ सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकत्मक पद्धतीने कपडे धुने आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १९ : परिट समाजाच्यावतीने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १९ सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकत्मक पद्धतीने कपडे धुने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठविण्यात आले. परीट समाज हा महाराष्ट्रामध्ये अंदाजे ३५  लाख लोकसंख्या असलेला समाज आहे. परंतु गेल्या ५५ वर्षापासून या समाजावर  शासनाकडून अन्यायच होत आहे. डॉ. भांडे समितीच्या शिफारशीनुसार परिट (धोबी) समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आली.या समाजावर  होणाऱ्या  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आतापर्र्यंत अनेक  वेळा शासन दरबारी विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली व महाराष्ट्र राज्यातील १९६ आमदारांना ई मेल व्दारे निवेदनही पाठविले आहे.

समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांसह बैठक घेऊन वरिल विषयांवर चर्चा करण्यासह परिट समाजाला सुविधा, आरक्षण तसेच अनेक समाजाचे  विकासाबाबतचे निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते; परंतु त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय वा चर्चा झाली नसून, ही बैठकही आयोजित करण्यात आली  नाही. त्यामुळे समाजाच्या विविध समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  सोमवारी १९ सप्टेंबर रोजी  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर  समाजाच्यावतीने व अहिंसा मार्गाने कपडे धुणे, आंदोलन करण्यात आले.