शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

VIDEO : गणेश उत्सव तलावांसाठी ठरतोय कर्दनकाळ, निर्माल्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: September 8, 2016 12:21 IST

तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे.

नीलेश शहाकार, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ८ -  तलावाचे शहर म्हणून बुलडाणा शहरातचा इंग्रज काळापासून नावलौकिक आहे. शहर परिसरातील सात तलावांचा ऐतिहासिक वारसा जपता जपता सध्या शहरात केवळ तीन तलावांचे अस्तित्व शिल्लक आहे. परंतु याही तलावांच्या वैभवाला आता प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये देवपुजेचे निर्माल्य नागरिकांकडून बेधडकपणे शहरातील तलावांमध्ये फेकले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होवून पर्यावरणास धोका निर्माण होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील तार तलाव, लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झाले आहेत. त्यातच इंग्रजकाळात शहराला पाणी पुरवठा करणाया संगम तलावाला निर्माल्य, घरकुती कचरा व पाणपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे.त्यामुळे तलावाच्या काठशेजारी कचºयाचे ढिगारे साचलले दिसतात. त्यामुळे लवकर या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात बुलडाणा- औरंगाबाद मार्गावरील संगम तलाव नामशेष होण्याची शक्यता निर्माण होवून शकते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता.त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वर्षे शहराला संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता.  तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव केव्हाचेच नामशेष झाले आहेत. तर आता इंग्रजकालीन पाणी पुरवठा करणा-या संगम तलावाचे व सरकारी तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत आता नागरिकांनी जागृक होण्याची गरज आहे. परिसर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे  संगम तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आता विशेष लक्ष देत, प्रशासनाकडून येथे नागरिकांच्या सोईसाठी येथे ‘वॉकिंग ट्रैक’ तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र प्रशासनाचे तलावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. तलाव प्रदूषित होण्याला सर्वात मोठे कारण गणेश उत्सवात मूर्ती विसर्जन, निर्माल्य, कचरा तलावात फेकण्याचे आहे.⁠⁠⁠⁠