शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हुंडा घेणार नाही-देणार नाही, तरुणतरुणींनी घेतली शपथ

By admin | Updated: April 15, 2017 22:09 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 15 - हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये, म्हणून एखाद्या तरुणीने आत्महत्या करणे ही एक लाजिरवाणी ...

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 15 - हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये, म्हणून एखाद्या तरुणीने आत्महत्या करणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. लालमहाल पुणे येथे हुंडाविरोधी चळवळी निमित्त तरुण तरुणींनी लाल महालातील जिजाऊच्या पुतळ्यासमोर हुंडा घेणार नाही व घेऊ देणार नाही, अशी शपथ घेतली 
 
शिंदे म्हणाले, पुढील काळात कोणत्याही महिलेने आत्महत्या करू नये, यासाठी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकरी व कष्टकरी यांच्या मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा व मुलांचा शैक्षणिक  खर्च राजर्षी शाहु महाराज जयंती २६ जुन रोजी संभाजी ब्रिगेड करणार आहे. तसेच महिलांसाठी मदत म्हणून संभाजी ब्रिगेड निर्भया हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. महिलांच्या सरंक्षणासाठी व न्याय हक्कासाठी यापुढे शेतक-यांचा पुत्र म्हणून संभाजी ब्रिगेड काम करणार आहे. 
 
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करून शितल वायाळ यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर,  वरिष्ठ उपाध्यक्ष  जोतिबा नरवडे, संघटक सुभाष जाधव, संघटक, मोनिका निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्ष प्राची दुधाने, उपाध्यक्ष सुरेखा जुजगर, सुभाष भोसले, अ‍ॅड विकास शिंदे, प्रितम कोंढाळकर, विजय मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शीतल वायाळची आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षाच्या शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या मुलीने शेतातील नापिकी आणि आर्थिक विवंचनेचा कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत सकाळी उडी मारून तीने आपली जीवनयात्रा संपविली. मृत्यूपूर्वी तिने एक पत्र लिहून ठेवले असून त्यात तिने आपल्या घरची परिस्थिती विषद केली आहे. 
दोन बहिणींचे कसे-बसे लग्न करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नासाठी कुणी कर्जही देत नाहीत.
 
कारण गेल्या ४ वर्षांपासून शेतातही काही पिकत नाही. त्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती न पहावल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तीने लिहिले आहे. आपण केलेल्या या कृत्यामुळे घरातील कुणालाही जबाबदार धरू नये असेही तिने शेवटी नमूद करीत आपले नाव लिहिले आहे.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844vq5