शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

VIDEO : शिक्षणातून घडणारी संस्कृतीच करेल देशाचे संरक्षण- राज्यपाल

By admin | Updated: October 24, 2016 17:19 IST

आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 24 -  आज समाजात आणि देशात असुरक्षीततेची भावना व्यक्त होत आहे, गावाची आणि देशाची सुरक्षीतता संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ सांस्कृतिक वारसा असलेला हा देश सतराव्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शक होता. संस्कृतीची हीच ताकद लक्षात घेता सैन्य, बॉम्ब किंवा सर्जिकल स्ट्राईकची गरज नाही, शिक्षणातून घडणारे संवेदनशील शांत मन आणि त्यातून उभी राहणारी संस्कृतीच गावाचे आणि देशाच्या संरक्षणाचे काम करू शकेल असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटी व इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेशन फॉर वर्ल्ड पीस यासंस्थेच्या वतीने आयोजित सुशासन आणि शांततेसाठी शिक्षण या विषयाच्या परिषदेच्या उद्घाटनाप्रंसगी राज्यपाल बोलत होते. येथील एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष अरूण निगवेकर होते. तर व्यासपीठावर अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, शिक्षण तज्ज्ञ तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणिस डॉ. मो. स. गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड अणू उर्जा शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पालघर की इथोपीया? राज्यपालांचा सवाल-पालघर येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या विषयावर बोलताना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या ठिकाणी भूक आणि कुपोषणाने पडणारे बळी बघितल्यावर हे इथोपिया तर नाही ना असा प्रश्न पडत असल्याचे मत व्यक्त केले. सध्या पालघर येथील कुपोषीत बालकांची छायाचित्रे माध्यमात येत आहेत. भूकेने येथे अनेकांचे बळी जात आहेत, ही दुर्देवी बाब असल्याचे सांगून राज्यपालांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डहाणू येथे राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठ स्थापन केले जात आहे, त्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या कौशल्याधीष्ठीत शिक्षणक्रमांमुळेच आदिवासींसारख्या मागास समाजाच्या समस्या सुटतील असेही ते म्हणाले.