ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ५ - परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाचे सैराट फेम रिंकू राजगुरू अर्थात आर्ची आणि परश्या यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन झाले. यावेळी रिंकू आणि परश्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या श्रीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात आज आर्ची आणि परश्याच्या हस्ते झाली. परळीत आर्चीला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली आहे.