शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:16 IST

Eknath Shinde : शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे. 

शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो ठळकपणे लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसेच आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असा एक बॅनर प्रसिद्ध करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे.

शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक नगरसेवकाला किमान पाच बस घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसराShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण