शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

VIDEO: टाइपरायटरवर चित्र काढणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:48 IST

तुम्ही वॉटरकलर, पेन्सील, खडू वापरुन केलेली चित्रे पाहिली असतील परंतु मुंबईतल्या चंद्रकांत भिडेंनी टाइपरायटरचा वापर करुन हजारो चित्रे काढली आहेत. पन्नास वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे.

मुंबई- हजारो पोरांना नोकरी लावणाऱ्या या मशीनची जागा आता अडगळीत आहे; पण चंद्रकांत भिडे यांची बोटं गेली पन्नास वर्षे टायपिंग करत आहेत. टायपिंग करता करता त्यांनी टंकलेखन यंत्रावरच चित्र काढायला सुरुवात केली. असं चित्र काढायची कल्पना आलेले ते पहिलेच व्यक्ती असावेत. युनियन बँकेतून निवृत्त झालेल्या भिडे दादरमध्ये राहातात.६७ सालापासून भिडे बॅंकेत नोकरी करत होते. खरं तर त्यांना जे.जे.मध्ये शिकायचं होतं. पण परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि त्यांच्या हातात टाइपरायटर आला. पण आतला कलाकार गप्प बसलेला नव्हताच. नोकरीच्या ठिकाणीच त्यांनी टायपिंगमध्ये काही नवे प्रयोग केले. एकेदिवशी इंटरकॉमच्या फोन नंबरची यादी त्यांनी टेलिफोनच्या आकारातच टाइप केली. मग त्यांना सुचलं की फोन काढता येतो तर चित्र का नाही काढता येणार? त्यांनी धडाधड 'एक्स' (x)  हे  बटण वापरून गणपती काढायला सुरुवात केली.सगळ्या रूपातले गणपती, अष्टविनायक झाल्यावर त्यांनी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर यांची चित्र काढायला सुरुवात केली. मग एक्ससारखी दुसऱ्या बटणांचा वापर करूनसुद्धा ते चित्र काढायला लागले. झालं. त्यांच्यातल्या कलाकाराला रोजच्या कामातूनच नवी वाट मिळाली.. भिडेंचे टाइपरायटरवर रोज नवे प्रयोग सुरू झाले. रोज नवे चित्र त्यांच्या मशीनमधून तयार होऊ लागले. एके दिवशी त्यांनी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमनमॅनच मशीनवर काढला, कॉमनमॅनसारखा मारिओ मिरांडा यांचा मिस्टर गोडबोलेसुद्धा त्यांनी कागदावर उमटवला. एक वेगळ्या वाटेवरचा कलाकार म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली. आर.के. लक्ष्मण, मिरांडा यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी आणि कौतुकाची थाप दिल्यावर भिडे यांच्या चित्रांची प्रदर्शनही भरू लागली. चंद्रकात भिडे यांना या आगळ्यावेगळ्या कलेमुळे मोठमोठ्या साहित्यिक, कलावंत, लेखकांना भेटता आलं. त्यामुळे त्यांच्या या छंदाबद्दल आणि टाइपराईटरप्रती ते कृतज्ञता व्यक्त करतात.

टॅग्स :typewriterटाइपरायटरartकलाMumbaiमुंबई