शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अकोल्यातील रॅन्चोनं बनवली मिस्ड कॉलनं सुरू होणारी बाईक

By admin | Updated: July 14, 2017 14:24 IST

देवानंद आग्रे/ऑनलाइन लोकमत  रोहणखेड (अकोला ), दि. 14 - मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन दुचाकी सुरू करण्याचा अभिनव प्रयोग चिंचोली ...

देवानंद आग्रे/ऑनलाइन लोकमत 
रोहणखेड (अकोला ), दि. 14 - मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन दुचाकी सुरू करण्याचा अभिनव प्रयोग चिंचोली येथील अक्षय मंगल तेलगोटे या युवकाने साकारला आहे. विशेष म्हणजे कितीही अंतरावरून दुचाकी केवळ मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन सुरू करता येत असल्याचे अक्षयने सांगितले. 
 
अंजनगाव तालुक्यातील चिंचोली येथील अक्षय तेलगोटे हा रोहणखेड येथे आला असता त्याने मोबाइलद्वारे दुचाकी सुरू करण्याचा प्रयोग करून दाखवला. अक्षयच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्याला लहानपासून वेगवेगळे प्रयोग करण्याचा छंद आहे. या छंदातूनच त्याने दुचाकी मोबाइलवर मिस्ड कॉल देऊन सुरू करण्याचा प्रयोग केला आणि विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 
 
दुचाकीमध्ये अक्षयने सीमकार्ड बसवले आहे. हे सीमकार्ड डीव्हीडीच्या सर्किटला जोडून दुचाकीच्या इंजिनला जोडले आहे. सीमवर कॉल केला असता ते अ‍ॅक्टिव्हेट होते. सीमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर दुचाकीचे इंजिनही सुरू होते, असे अक्षय तेलगोटे याने सांगितले. 
 
हा प्रयोग त्याने रोहणखेड येथे करून दाखवल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे भरभरुन कौतुक केले. अक्षयचं केवळ नववीपर्यंत शिक्षण झालेले आहे. परिस्थितीमुळे त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. पण त्याच्या अभिनव प्रयोगामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
https://www.dailymotion.com/video/x8457o8