शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

VIDEO : राधानगरी धरणावर शाहू महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By admin | Updated: January 11, 2017 20:28 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 11 - कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 मध्ये राधानगरीत ...

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 - कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांनी 1908 मध्ये राधानगरीत ऐतिहासिक धरण उभारले. त्यामुळे येथील परीसर सुजलाम,सुफलाम् करणाऱ्या महाराजांच्या आठवणी, त्यांचा इतिहास आजही स्वाभिमानाने मिरवला जातो. या धरण परिसराला भेटी देताना त्यांच्या कार्यामुळे अनेक जण प्रभावित होतात. मात्र त्याच धरण परिसरात त्यांच्या नावाची पाटी, स्मारक किंवा पुतळा नाही? त्यामुळे त्यांचे स्मारक याठिकाणी व्हावे, अशी मागणी होत असताना तत्कालीन प्रशासन आणि राज्यकर्त्यांना तांत्रिक मर्यादा होत्या. मात्र आता याठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य अशा स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली. बुधवारी विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
जे लोक इतिहासाचे स्मरण ठेवतात तेच लोक पुन्हा इतिहास घडवितात. याच जाणिवेतून लोकभावनेचा आदर करत शेवटी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती अभिजीत प्रभाकर तायशेटे यांनी त्यांच्या स्मारकासाठी जि.प च्या विशेष निधीतून तब्बल 40 लाखांची आर्थिक तरतूद केली आणि वर्षभरातच धरणावर हे स्मारक उभारण्याचा संकल्प केला.
याच धरणाच्या पायथ्याशी महाराजांचा जीवनपट सांगणारे माहिती केंद्र, महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य अशा स्मारकाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. भोगावती येथून राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा भव्य मिरवणुकीने ढोल, ताशा, झांज पथकाच्या निनादात, अभूतपूर्व उत्साह आणि गावोगावी  मनस्वी पूजा, पुष्पवृष्टी आणि हजारो शाहू प्रेमीच्या साक्षीने आणाजे पर्यंत तेथून पुढे खिंडी व्हरवड़े, गुडाळ, करंजफेण, राधानगरी मार्गावरून ही ऐतिहासिक मिरवणूक थेट धरणावरील स्मारकस्थळी पोचली. अनेक पिढ्यांचे हे स्वप्न साकारताना,अगदी घरादारापर्यंत विकासाची, हरितक्रांतीची 'गंगा' पोहचविणाऱ्या या महापुरुषाला उपस्थितांनी अभिवादन केले.
 

 

https://www.dailymotion.com/video/x844nve