शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 12:12 IST

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या व इतर प्रमुख मागण्यांसाठी आज अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. २४ -  अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अधिक कडक कराव्यात, ओ. बी. सी. आरक्षणास धक्का लागू न देता मराठा समाजास तसेच मुस्लिम समाजास आरक्षण द्यावे, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, ओ.बी. सीं. ची जातवार जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या व इतर प्रमुख मागण्यांसाठी आज अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी वाडिया पार्क स्टेडियममधून मोर्चास सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर चाँदनी चौकात सभा होणार आहे. त्यात निवडक वक्ते मोर्चेकऱ्यांसमोर बोलणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात विविध प्रकारच्या एकूण एकवीस मागण्यांचा समावेश असल्याचे बहुजन क्रानती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.मोर्चासाठी चाँदणी चौकात मंच उभारण्यात आला आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या रस्त्या रस्त्यांवर निळे, पिवळे, हिरवे झेंडे लावलेल्या वाहनांमधून मोर्चेकरी सकाळपासूनच जथ्थ्याने येण्यास सुरुवात झाली आहे. विविध संस्था, मंडळे व संघटनांकडून पिण्याच्या पाण्याच्या पाऊचचे ठिकठिकाणी वाटप करण्यात येत आहे. काही ठिकाणी नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे. पांढऱ्या शुभ्र साड्या परिधान केलेल्या महिला हाती निळे झेंडे घेऊन एकच गर्व, बहुजन सर्व, एकच साहेब....बाबासाहेब’ अशा घोषणात देत मोर्चास्थळाकडे रवाना होत आहेत. शिर्डी-मनमाड रस्त्याने शहरात येणाऱ्या एस. टी. बसेस विळद घाटातील बाह्य वळण रस्त्यावरच थांबविण्यात आल्या आहेत. इतरही मार्गावरील बसेसही बाह्यवळण रस्त्यानेच शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. नगर शहर घोषणांनी दुमदुमले आहे.