शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - 'हे राम नथुराम' नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: January 28, 2017 16:08 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 28 -  ‘हे राम, नथुराम’चा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने ...

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 28 -  ‘हे राम, नथुराम’चा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने शनिवारी पुण्यात केला. पोलीसांनी ठेवलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे प्रयोग बंद पाडणे शक्य झाले नाही. 
पुण्यातील अण्णाभाउ साठे सभागृहात दुपारी एक वाजता हा प्रयोग होतो. याची माहिती असल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. कॉँग्रेसचे कार्यकर्ते जास्त आक्रमक होते. त्यांनी सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्यांना रोखले.  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते मात्र एका बाजुला राहून घोषणा दिल्या. 
शरद पोंक्षे यांचे हे नाटक असून यामध्ये गांधीजीचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही नाटकाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्यांनी सभागृहाच्या मुख्यद्वाराला कडे करून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. 
(‘‘नथुराम गोडसे ‘आरएसएस’चाच सदस्य!’’ : युनाइट इंडिया फोरम)
 
यापूर्वीची 'हे राम नथुराम' विरोधातील निदर्शनं 
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी रात्री ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी गोंधळ घालून, प्रयोग बंद पाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज राजपूरकर यांच्यासह 10 जणांवर नौपाडा पोलिसांनी कारवाई केली.
 
नागपुरातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडने या नाटकाचा जोरदार विरोध करत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहासमोर आंदोलन केले होते. नथुरामचे उदात्तीकरण करून महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचा हा प्रयत्न असून नाटक बंद करावे, अशी मागणी या पक्षांतर्फे करण्यात आली होती.   
 
औरंगाबादेत  देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकाचा प्रयोगावेळीदेखील काँग्रेस, संभाजी ब्रिगेड,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844q4u