शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विदर्भ हवाच

By admin | Updated: August 22, 2014 01:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी वर्धा रोडवरील अजनी चौकात मानवी साखळी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष

विदर्भवाद्यांनी वेधले पंतप्रधानांचे लक्ष : आंदोलनकर्ते तीन तास पावसात नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी वर्धा रोडवरील अजनी चौकात मानवी साखळी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आणि स्वतंत्र विदर्भ राज्य देऊन भाजपाने आपले आश्वासन पाळावे, अशी मागणी केली. पंतप्रधानांची प्रतीक्षा करीत आंदोलनकर्ते तब्बल तीन तास भरपावसात विदर्भाच्या घोषणा देत उभे होते, हे विशेष. भाजपाने आपल्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच निवडणुकीतही भाजपाच्या नेत्यांनी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच नागपुरात आले असता. त्यांचे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि भाजपाने दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात विविध विदर्भवादी संघटनांच्यावतीने गुरुवारी अजनी चौकात ५०० फुटाचा बॅनर घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा किमी लांब मानवी साखळी तयार केली होती. दुपारी ३ वाजेपासून आंदोलनकर्ते अजनी चौकात मानवी साखळी तयार करून होते. यादरम्यान विदर्भाच्या घोषणा देत विदर्भवाद्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पावसानेही दमदार हजेरी लावली. पावसाची ये-जा सुरू होती. पोलिसांची तारांबळ उडाली परंतु आंदोलनकर्ते मात्र हटले नाही. त्यांनी पावसात उभे राहूनच विदर्भाच्या घोषणा सुरुच ठेवल्या. या मानवी साखळीद्वारे आंदोलनकर्त्यांनी अजनी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तीन तास अडवून ठेवला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा विमानतळावरून कस्तूरचंद पार्ककडे जात असतानाच अजनी चौकातील या मानवी साखळीने त्यांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांचे आगमन होताच आंदोलनकर्त्यांनीही विदर्भाचा आवाज बुलंद केला. तब्बल ३ तास विदर्भवादी भर पावसात विदर्भाचा आवाज बुलंद करीत उभे होते. या आंदोलनात ज्येष्ठ नेते वामनराव चटप, राम नेवले, श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, दिलीप नरवडीया, प्रभात अग्रवाल, शेर खॉ पठाण, भीमराव फुसे, बाबुराव गेडाम, शैलाताई देशपांडे, शबीर शेख, बबलू पठाण, गणेश शर्मा, यांचा समावेश होता.अश्वजित पाटील, अण्णाजी राजेधर, विवेक तिवारी, जगदीश बोंडे, रेखा पराते, मंजू पराते, अनिता हेडावू, शकुंतला वट्टीघरे, धनंजय केळापुरे, प्रभावती देवघरे, शालू नंदनवार, लता खापेकर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)मस्के दाम्पत्याने वेधले लक्ष विदर्भाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या शोभा मस्के आणि त्यांचे पती बाबाराव मस्के दाम्पत्यसुद्धा या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ हा महाराष्ट्राच्या साखळदंडात कसा अडकून आहे, हे दर्शविण्यासाठी त्यांनी आपले अंग प्रतिकात्मक साखळदंडाने जखडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. काँग्रेसने दाखविले काळे झेंडे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने अजनी चौकात मानवी साखळी आंदोलन सुरू असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आले. पंतप्रधान परत जा, अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या हातात काँग्रेसचा ध्वज होता. पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले व गाडीत बसवून नेले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसचे नाना झोडे, परमेश्वर राऊत, प्रवीण पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. सहपोलीस आयुक्तांसोबत आंदोलनकर्त्यांची बाचाबाची दुपारी ३ वाजेपासून आंदोलनकर्ते शांततेने आंदोलन करीत होते. दरम्यान अचानक आंदोलनकर्ते रस्त्यावर आले. त्यांनी मानवी साखळी तयार करून अजनी रेल्वे स्टेशकडे जाणारा रस्ता रोखून धरला. तरीही आंदोलन शांततेत सुरू होते. काही वेळांनी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना मागे करण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. आंदोलनकर्ते थोडे मागे सरले. परंतु आणखी मागे होण्यास सांगण्यात येत असल्याने आंदोलनकर्ते चिडले. अटक करायची असेल तर करा पण मागे हटणार नाही, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका होती. त्यामुळे काही वेळ आंदोलनकर्ते व अनुकुमार सिंग यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती हे आंदोलनात सहभागी होते. त्यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर आंदोलनकर्ते व पोलीसही शांत झाले.