शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापूस पिकाच्या व्यवस्थापनावर भर!

By admin | Updated: March 26, 2016 02:12 IST

खरीप हंगामाचे नियोजन आतापासूनच; अतिघनता लागवडीवर शासन लक्ष देणार.

अकोला: विदर्भातील कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सलग चार ते पाच वर्षांपासून उत्पादन घटले असल्याने शेतकरी या पिकाच्या बाबतीत साशंक असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापसाच्या व्यवस्थापनावर भर दिला असून, येत्या खरीप हंगामात अतिउच्च घनता पद्धतीचा वापर वाढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अतिघनता लागवड करण्यासाठी यावर्षी शासनही लक्ष देणार आहे.विदर्भात कापसाचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरच्या वर आहे. तथापि, अलीकडे हे क्षेत्र कमी होत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून दक्षता घेतली जात आहे. शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाची एकेएच 0८१ व एकेएच 0७ या अति उच्च घनता लागवड करावी, यासाठी या कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्‍यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे; परंतु असे असले तरी या दोन जातीचे बियाणे शेतकर्‍यांना कितपत उपलब्ध होईल, यावर सर्व अवलंबून आहे. कापूस पिकाच्या अतिउच्च घनता लागवडीसाठी शासनाने यावर्षी लक्ष केंद्रित केले असून, यासंदर्भात लवकरच कृषी विद्यापीठ, कृषी विभागाला आदेश दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. या बाबत कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाकडून कापूस पिकाचे आधुनिक व्यवस्थापन या विषयावर बुधवारी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये कापूस विकास संचालनालय नागपूरचा सहभाग आहे. कापूस विदर्भातील नगदी पीक असल्याने कापूस तंत्रज्ञानामध्ये विविध पद्धतींचा अवंलब करता येणे शक्य आहे. अधिक उत्पादनाकरिता शिफारस केलेल्या कापसाच्या जाती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास उत्पादनात निश्‍चित भर पडून नफा मिळवता येतो. अति घनता लागवडीचा अवलंब केल्यास हेक्टरी झाडांची संख्या वाढ होते, हे विशेष.