शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

निवडणुकीपूर्वीच विदर्भ राज्याचा निर्धार

By admin | Updated: July 27, 2014 01:18 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये

विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतिदिनी ‘बस देखो, रेल देखो’ आंदोलनवर्धा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे. तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची हीच संधी आता हातून जावू द्यायची नाही, असा निर्धार शनिवारी येथे विदर्भवाद्यांनी केला. वेगळ्या विदर्भासाठी जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वेगळ्या विदर्भाची’ शपथ घेतली. तसेच येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून विदर्भात ‘बस देखो, रेल देखो’च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाश्याला ‘विदर्भ बंधनाचा’ धागा बांधण्यात येणार आहे. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार इतर राजकीय पक्षांच्या कुबड्यांवर चालत होते. शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवनेश्वर येथे भाजपने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला. आता केंद्रात भाजपचे सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही, मात्र सत्ता येताच भाजपचा सूर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल. सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे. मग पुढील निवडणूक त्या आधारे जिंकायची, हा राजकीय डाव आहे. तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची हीच सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शक्य आहे, याकडे जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील व मान्यवरांनी लक्ष वेधले. जावंधिया यांनी या लढ्यात प्रत्येकाने स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्य कारभार करीत आहे, असेच सुरू राहिले तर केवळ दोन वर्षांत कापूस शेतकऱ्यांना खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. समाजातील इतर घटकांनाही याची झळ पोहचले. शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी विदर्भाचा लढा प्रत्येकाने लढण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचालन नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे, तर आभार कवी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)