शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:00 IST

पिकांचे प्रचंड नुकसान; बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण

नागपूर : ऐन हिवाळ्यात नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. बोचºया थंडीमुळेही लोक हैराण झाले.पावसामुळे नागपूरच्या अनेक भागांत पाणी साचले. गारपीट आणि वादळ व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीसह खरीप व रब्बी तसेच भाजीपाल्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड, काटोल, कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. हिंगणा, कामठी, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे झाडांना असलेला कापूस भिजला असून, गहू जमीनदोस्त झाला आहे. शिवाय, तुरी, हरभरा आणि भाजीपाल्याच्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा कमी-अधिक जोर कायम आहे. आर्वी व कारंजा तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले. आर्वी तालुक्यातील काही भागामध्ये एक फुटापर्यंत गारांचा ढीग साचला होता. आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, वर्धा व सेलू या तालुक्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती.भंडारा जिल्ह्यात तीन दिवस कोसळणाºया पावसाने शेतकरी चांगलेच धास्तावले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले धान अवकाळी पावसाने ओले झाले आहे. रब्बी पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. तुमसर, मोहाडी तालुक्यात टोमॅटोची शेती उद्ध्वस्त झाली आहे. लाखनी तालुक्यात तूर आणि भाजीपाल्यालाही फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यांत गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापूस, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला व फळांचे नुकसान झाले. चंद्रपूरमध्ये काही प्रमाणात खरिपातील धानाचे आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, चंद्रपूरचा पारा ५.१ अंशापर्यंत खाली घसरला होता.परभणी, नांदेड, हिंगोलीत पिकांवर विपरित परिणाममराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने फटका दिला. या पावसामुळे हरभरा, गव्हासह तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नांदेडच्या मुदखेड, लोहा, अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर, वारंगा फाटा, आडगाव रंजे, डोंगरकडा, कवठा, आखाडा बाळापूर, हयातनगर, दांडेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.गोंदिया जिल्ह्यात भात पिकाला फटकागोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला पावसाचा फटका बसला.अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.१० हजार हेक्टरमधील कडधान्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा आणि गहू ही पिके गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा भाजीपाला पिकांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. तूर, मूग, उडीद, लाखोळी हे पीक फुलावर आहे. धुक्यामुळे फूल गळत असल्याने उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.