शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यात धवलक्रांती

By admin | Updated: August 27, 2016 04:48 IST

८ जिल्ह्यांमधील २ हजार गावांमध्ये दुग्ध विकासाचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.

मुंबई : विदर्भ व मराठवाड्यात दुग्धव्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत ८ जिल्ह्यांमधील २ हजार गावांमध्ये दुग्ध विकासाचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, प्रधान सचिव विजय कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे चेअरमन दिलीप रथ, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर.जी.कुलकर्णी आदी उपस्थित होते. विदर्भातील ५ जिल्हे व मराठवाड्यातील ३ जिल्हे अशा एकूण ८ जिल्ह्यांत या उपक्र मातून ६० हजार कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजिविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील सुमारे ३ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार, वितरक, किरकोळ विक्र ेते व अन्य सुविधा पुरविणारे यांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रकल्प अंमलबजावणीच्या ३ वर्षांच्या कालावधीत सुमारे २ लाख कि.ग्रॅ. प्रतिदिवस एवढे दुध उत्पादन अपेक्षित आहे. त्याद्वारे २०० कोटी रु पये एवढी रक्कम दूध उत्पादकांना मिळणार आहे. विदर्भ व मराठवाडा या विभागातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नागपूर येथे नव्याने १०० दूध विक्री केंद्रे स्थापन करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.२ हजार गावांव्यतिरिक्त राज्य शासन इतर गावांत स्वतंत्र दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्र म राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)