शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शेतीत कापणीपश्चात यांत्रिकीकरणावर भर!

By admin | Updated: March 22, 2016 02:30 IST

आयसीएईएआरचा पुढाकार; डॉ. पंदेकृवित अंमलबजावणी.

अकोला: कृषिक्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून, कृषिसमृद्धीसाठी आता उत्पादन व कापणीपश्‍चात यांत्रिकीकरणाची नितांत गरज असल्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) यावर भर दिला आहे. विदर्भात या उपक्रमाची अंमलबजावणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे.आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण शेतकर्‍यांना अधिक सोप्या भाषेत समजावे, यासाठी आयसीएआर (नवी दिल्ली) च्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रक ल्प अंतर्गत अभियांत्रिकी तंत्रज्ञान, शेती अवजारे व तंत्रज्ञान यावर शेतकर्‍यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. शेती व शेती उद्योगामध्ये ऊर्जा योजना अंतर्गत तंत्रज्ञान कृषियंत्रे व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मेळावे घेण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना यंत्र हाताळताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकीचे शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात याबाबत रविवारी विदर्भस्तरीय यांत्रिकीकरण मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी कृषी सहसंचालकांनी शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. युरोपीय देशामध्ये ९५ टक्के शेती यांत्रिकी पद्धतीने केली जात असून, आपल्याकडेही भविष्यात संपूर्ण शेती यांत्रिकीकरणाद्वारे करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षण विस्तार संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नसल्याने मेळाव्यातून होणारे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे शेतकर्‍यांनी अनुकरण केल्यास शेती करताना त्यांचा चांगला फायदा होईल, त्यासाठी कृषी विद्यापीठाच्यावतीने असे मेळावे घेत जात असल्याचे सांगितले. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी शेतीआधारित जोडधंदा निर्माण करता येत असल्याने या मेळाव्याचे विशेष महत्त्व असल्याचे ते म्हणाले.