ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - स्वतंत्र व छोट्या राज्याला पाठिंबा दर्शवणा-या भाजपाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात वेगळया विदर्भाचा समावेश केला नाही. भाजपाने आज मुंबईत निवडक नेत्यांच्या उपस्थितीत 'द्ष्टीपत्र' या नावाने जाहीरनामा प्रसिध्द केला. भाजपा स्वतंत्र विदर्भासाठी अनुकूल आहे त्यासाठी जाहीरनाम्यात वेगळया विदर्भासाठी आश्वासन देतील असे विदर्भवासियांना अपेक्षा होती. परंतू वेगळया विदर्भाचा मुद्दा भाजपाला डोकेदूखी ठरू शकतो याचा विचार करीत भाजपाने या निवडणुकीसाठी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला जाहीरनाम्यात जागा देण्यास टाळले आहे. मुंबईला तसेच विदर्भात महाराष्ट्रापासून भाजपाचा डाव आहे अशी टीका शिवसेना व मनसेने केली आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक त्वरीत केले जाईल, ठिबक सिंचनाला ५० सबसिडी देण्यात येणार, श्रमिक वृध्द पत्रकारांना १५०० मानधन देण्यात येईल यासारखे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहेत.