शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळ घोटाळ्याचा अकोला येथे बळी

By admin | Updated: February 5, 2016 04:10 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत,

यदु जोशी/ नितीन गव्हाळे , मुंबई/ अकोलामहाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत, अशा पद्धतीने संगनमत केले जात असल्याचे ‘लोकमत’ने दिलेले वृत्त ताजे असतानाच या रॅकेटचा फटका बसलेल्या अकोला येथील एका कंत्राटदाराने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.संतोष सावजी (४२) असे या कंत्राटदाराचे नाव असून, ‘मी टेंडर भरायला नको होते. ते भरण्याची मी चूक केली. मोठमोठ्या लोकांमध्ये मी मोठ्या रकमेचे टेंडर भरले. माझ्या कुटुंबाला वाचविण्यासाठी मी आत्महत्या करीत आहे,’ असे सावजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सावजी हे वखार महामंडळाच्या अन्नधान्य वाहतुकीच्या निविदा नियमितपणे भरत असत. गेली १०-१२ वर्षे ते या व्यवसायात होते. मात्र अलीकडे सावजी हे काही बड्या कंत्राटदारांच्या जाचाला त्रासले होते. त्यांनी जादा दराच्या निविदा भराव्यात किंवा निविदाच भरू नयेत, यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव येत होता, अशी माहिती आहे.वखार महामंडळातील कंत्राटदार, पुणे येथील मुख्यालयाचे अधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांतील काही अधिकारी यांच्या संगनमताने विशिष्ट कंत्राटदारांचेच चांगभले होत असल्याची उघड चर्चा आहे. तसेच गेल्या ६-७ वर्षांत अव्वाच्या सव्वा दराने अन्नधान्य पुरवठ्याची कंत्राटे देण्यात आली. यात गब्बर झालेले कंत्राटदार लहान कंत्राटदारांची मुस्कटदाबी करतात. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे, धुळे, जालना, लातूर, जळगाव आदी ठिकाणांहून करण्यात आल्या आहेत.संतोष सावजी यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, त्यांच्या बंधूंनी सांगितले की, संतोष यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माझे बंधू संतोष हे काही दिवसांपासून दबावाखाली होते. त्यांना कोणत्या कंत्राटदारांचा त्रास होता, त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.वखार महामंडळात कोट्यवधी रुपयांचा वाहतूक दर घोटाळा झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० आणि २१ जानेवारीच्या अंकात दिले होते.