शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने घेतला ट्रेकरचा बळी

By admin | Updated: June 27, 2016 05:05 IST

पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असताना गडावरून कोसळलेला एक दगड ट्रेकरच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

महाड : पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असताना गडावरून कोसळलेला एक दगड ट्रेकरच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली.अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार (२८, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, सध्या रा. पिंपळे सौदागर, पुणे) असे मृत तरु णाचे नाव असून, तो पुण्यात एका आयटी व्यवस्थापनात इंजिनीअर म्हणून सेवेत होता. अजयप्रतापसिंह हा आपल्या १६ सहकाऱ्यांसमवेत शनिवारी पहाटे किल्ले रायगड ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर गड उतरत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या कड्यावरून सुटलेला एक दगड थेट अजयप्रतापसिंहच्या पाठीवर आदळून त्यालागंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला प्रथम पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला महाड ग्रामीण रु ग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी प्रशांतकुमार मिश्रा याने या घटनेची माहिती महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक एन.पी. पाटील हे करीत आहेत. रविवारी त्याचे पार्थिव त्याच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले. (वार्ताहर)>डोंबिवलीतील ट्रेकरचाही मृत्यू : पेब किल्ल्याजवळील घटनाकल्याण : भिवपुरी येथे मित्रांसोबत ट्रेकिंगला गेलेल्या हर्षद भोळे या डोंबिवलीकर विद्यार्थ्याच्या डोक्यावर दगड पडल्याने शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षद हा डोंबिवली पश्चिमेकडील कान्हा सदन येथे आईवडील आणि मोठा भाऊ प्रणय यांच्यासमवेत राहायचा. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलुंड येथील एका महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणारा हर्षद शनिवारी मोठा भाऊ प्रणय आणि त्याच्या चार मित्रांसोबत भिवपुरी-माथेरानला जोडणाऱ्या पेब किल्ला येथे ट्रेकिंगला गेला होता. या वेळी अचानक तेथील एक मोठा दगड त्याच्या अंगावर घरंगळत आला. यात त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्याला वाचवताना भाऊ प्रणय आणि अन्य एक मित्रदेखील जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या हर्षदला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नेरळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशिरा हर्षदचा मृतदेह डोंबिवलीत आणल्यानंतर शिव मंदिर मोक्षधाम स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. >भारतीय पुरातत्त्व विभागाची निष्क्रि यता किल्ले रायगड भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गडाच्या कड्यांवरून छोटे-मोठे दगड सुटून पायऱ्यांवर कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र पुरातत्त्व विभागाने यावर प्रतिबंधक उपाय करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दगड अंगावर पडून पर्यटकाचा मृत्यू होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. किमान यानंतर तरी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.>भारतीय पुरातत्त्व विभागाची निष्क्रि यता किल्ले रायगड भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गडाच्या कड्यांवरून छोटे-मोठे दगड सुटून पायऱ्यांवर कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र पुरातत्त्व विभागाने यावर प्रतिबंधक उपाय करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दगड अंगावर पडून पर्यटकाचा मृत्यू होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. किमान यानंतर तरी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.