नाशिक : घोटी पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने उघडकीस आलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथे अंधश्रद्धेतून दोन महिलांचे बळी घेतल्याच्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्यात आला आहे.संबंधित प्रकरणात दोन महिलांचे मृतदेह दफन केलेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहाही संशयितांच्या कोठडीत वाढ केली आहे. संशयिताना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इगतपुरी न्यायालयाने दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्यास येत आहे. मांत्रिक महिलेची आई सन्नीबाई बुधा निरगुडे हिस सोमवारी अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
नाशकात अंधश्रद्धेचे बळी; तपास विशेष पथकाकडे
By admin | Updated: January 6, 2015 02:03 IST