शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकाने घेतला रिक्षाचालकाचा बळी

By admin | Updated: July 22, 2016 02:29 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ह्लोली पादोस पाड्या जवळ मीरा भार्इंदर महानगरपालिकेची पाटी असलेली कारच्या धडकेने रिक्षाचा अपघात

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ह्लोली पादोस पाड्या जवळ मीरा भार्इंदर महानगरपालिकेची पाटी असलेली कारच्या धडकेने रिक्षाचा अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालक अबरार उर्फ (पिंट्या) खुर्शीद शेख याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच मनोर परिसरात दुखाचे सावट पसरले. अपघातानंतर त्याने दोन दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर आज संपली. बुधवारी त्याच्या मृत्यूची वार्ता धडकताच रिक्षा चालकांनी एक दिवस आपल्या रिक्षा बंद ठेवल्या होत्या. मे महिन्यातच रिक्षा चालकाच लग्न झाले होते. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता त्या कारमध्ये बिसलरीच्या बाटलीत दारू असल्याची माहिती उजेडात आली आहे. मनोर पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहन वामन वानखेडे यास अटक केले होते. त्यानंतर त्याची सुटका ही करण्यात आली आह. मनोर पोलीस ठाण्याचे हवालदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या दिवशी अपघात घडला होता त्या दिवशी अबरार जखमी आहे, अशी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याचे निधन झाल्याने कोर्टाला कळवून कलम वाढवून आरोपीवर कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा कारवाई करू. तसेच चालकाचे रक्त नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. कारमध्ये प्लास्टिकचे बाटल्या सापडले त्यात दारू होती. तेही चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर) >अबरारचा परिवार झाला अनाथअबरार हा १६ जुलैला रिक्षा घेऊन जात असताना लोली पाडोस पाडा गावाजवळ त्याच दिशेने मीरा भार्इंदर नगरपालिका अशी पाटी असलेल्या कारचा चालक मोहन वानखेडे याने मद्यधुंद नशेत भरधाव वाहन चालवून रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने ती खड्यात पलटी झाली. अबरारला मुंबई येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसाने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.