शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपालांची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 10:45 IST

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे.

मुंबई, दि. 18 - मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि राज्यपालांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत निकालाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.    

मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची पहिली डेडलाइन चुकल्यानंतर विद्यापीठाच्या कारभारावर सर्व बाजूंनी टीका करण्यात आली होती. 5 ऑगस्टची दिलेली दुसरी डेडलाइनही विद्यापीठाला पाळता आलेली नाही. 212 अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत.

वाचा आणखी बातम्या(गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समिती)(नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकलं नाल्यात ; महिला फरार)

(धक्कादायक ! काम करण्यास नकार देणा-या दलित महिलेचं कापलं नाक)

यंदा एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली. त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्ट महिना उजाडूनही उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूच आहे. मुंबई विद्यापीठाला सर्व 477 अभ्यासक्रमांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 4 जुलै रोजी दिले होते, पण विद्यापीठाने ही डेडलाइन पाळली नाही. त्यानंतर विद्यापीठाला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण ही डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकलेले नाहीत. 

15 ऑगस्टलाही निकाल चुकलाच मुंबई विद्यापीठाने स्वत:हून 15 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, 15 ऑगस्टलादेखील निकाल लागू शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका केली जात आहे.  

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ