शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

विकोचे संजीव पेंढरकर यांना पुरस्कार

By admin | Updated: September 23, 2015 01:04 IST

मुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून विको लेबॉरेटरिजच्या आयुर्वेदिक उत्पादनांकरिता नुकताच ‘कॉम्पॅसिओनेट बिझनेस’ हा पुरस्कार देण्यात आला आहे

नागपूर : मुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून विको लेबॉरेटरिजच्या आयुर्वेदिक उत्पादनांकरिता नुकताच ‘कॉम्पॅसिओनेट बिझनेस’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी विको लेबॉरेटरिजचे संचालक संजीव पेंढरकर म्हणाले, आमचे ग्राहक हे उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी अतिशय जागरूक आहेत आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी तेवढेच जागरूक आहोत.‘पेटा’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांद्वारे उत्पादनांचे सखोल परीक्षण केल्यानंतर विको लेबॉरेटरिजला हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार दोन वर्षांच्या अवधीकरिता ग्राह्य धरला जाईल. हा पुरस्कार मिळणे हाच आमच्याकरिता मोठा सन्मान असल्याचे पेंढरकर म्हणाले. मुंबई येथे ‘पेटा’ ही संस्था कार्यरत आहे. मुक्या प्राण्यांप्रति अनुकंपा बाळगून त्यांना संवेदनात्मक वागणूक मिळवून देणाऱ्या लोकांची ही संस्था असून अशा लोकांकरिताच ही संस्था कार्य करीत आहे. खाद्यान्न आणि लेदर उद्योगात प्रयोगशाळांमध्ये तसेच ज्या ठिकाणी लोकांना मनोरंजनाकरिता म्हणून जनावरांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची ठिकाणं ‘पेटा’ शोधून काढते आणि तेथील लोकांना भूतदयेविषयी जागरूक करण्याचे कार्य करते. संस्थेने सर्कसमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांनाही वाचविले आहे. ‘पेटा’ या संस्थेशी अनेक नावे जुळली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने जॉन अब्राहम, शाहीद कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिलीपकुमार, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, मलायका अरोरा यांचा समावेश आहे. (वा.प्र.)