शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

मुंब्य्रात ‘इसिस’विरुद्ध ‘तकरीब’

By admin | Updated: May 29, 2017 05:54 IST

ठाण्यालगतच्या मुंब्रा या मुस्लिमबहुल वस्तीमध्ये इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा वावर असल्याचे अनेक कारवायांद्वारे

- जितेंद्र कालेकर, ठाणे -ठाण्यालगतच्या मुंब्रा या मुस्लिमबहुल वस्तीमध्ये इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा वावर असल्याचे अनेक कारवायांद्वारे उघड झाले आहे. गेल्याच महिन्यात उमर ऊर्फ नाझीमच्या अटकेने पुन्हा हे कटू वास्तव अधोरेखित झाले. मुंब्रा हे दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून जसे ओळखले जाते तसेच ते अमली पदार्थांच्या तस्करीचे ठिकाण म्हणूनही नावारूपाला आले आहे. बहुतांश रहिवाशांचा दहशतवादी कारवाया किंवा अमली पदार्थांची तस्करी याला विरोध आहे. मात्र, काही मोजकीच मंडळी अशा गैरकृत्यांना साथ देतात आणि विनाकारण एक शहर व एक विशिष्ट समाज बदनाम होतो. हे टाळणे मुंब्य्रातील रहिवाशांच्याच हाती आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील एक उपनगर मुंब्रा. सुमारे सात लाख लोकसंख्येच्या या शहरात दाटीवाटीची वस्ती आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या भागात नामचीन गुन्हेगारांसह अगदी दहशतवाद्यांनीही आश्रय घेतला आहे. अगदी गेल्याच महिन्यात ‘इसिस’ या जागतिक दहशतवादी संघटनेच्या एका संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी जेरबंद केले. त्यापूर्वी साधारण वर्षभरापूर्वी मुद्दबीर शेख या ‘इसिस’च्या भारतामधील मुख्य कमांडरलाही अटक झाली होती. पाकिस्तानच्या ‘लष्कर-ए-तोएबा’ आणि ‘हिजबुल’च्या अतिरेक्यांचे वास्तव्य याच परिसरात होते. एका ठरावीक समाजाचेच लोक या भागातून पकडले गेले असले, तरी त्या संपूर्ण समाजाचा देशविघातक कारवाया करणाऱ्यांना कधीच पाठिंबा नसतो आणि नाही. मग, तरीही मुंब्रा किंवा कौसा भागातच या कारवाया का होतात? इथे का दहशतवादी पोसले जातात? का इथेच ते आश्रयाला येतात? त्याची उत्तरे आता पोलीस आणि दक्ष नागरिक यांनी शोधून तशी जनजागृती आणि ‘तकरीब’ करण्याची खरी गरज आहे.अगदी अलीकडे २० एप्रिल २०१७ रोजी पहाटे देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून मुंब्य्रातून उमर ऊर्फ नाझीम याला मुंबई दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकासह दिल्ली, आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केली. या पथकांनी देवरीपाड्यातील रशीद कम्पाउंडमधील ‘अक्रम मंजिल’ या इमारतीमधील एका घरातून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक लाख ६५ हजारांची रोकड आणि मोबाइलही हस्तगत केला. नाझीम हा मुंब्रा परिसरात लहान मुलांसाठीच्या पेप्सीविक्रीचा व्यवसाय करीत होता, तर त्याचा अन्य एक साथीदार मुंब्य्रातच अंडेविक्रीचा व्यवसाय करीत होता.यापूर्वीही म्हणजे जानेवारी २०१६ मध्ये ‘इसिस’च्या संपर्कातील मुंब्रा, अमृतनगर भागातील मुद्दबीर शेख याला एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि मुंबई दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ठाणे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइल, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली होती.बेरोजगार असलेला शेख अमृतनगरच्या ‘रेश्मा अपार्टमेंट’मध्ये पत्नी आणि दोन लहान मुलींसह वास्तव्याला होता. तो ‘इसिस’च्या संपर्कात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली होती. वेब डिझायनिंगची कामे करताना इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा ‘इसिस’शी संपर्क आला. त्यातून तो दिल्ली, हैदराबाद आणि बाहेरच्या देशातील लोकांच्या संपर्कात होता. ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेत जाण्याच्या तयारीत असलेला मुद्दबीर हा ठाणे जिल्ह्यातील पाचवा संशयित ठरला. तो मुंब्य्रातून ‘इसिस’चे देशभरातील जाळे नियंत्रित करत होता. इसिसचे काम कसे चालते? ते कसे चांगले आहे? याची प्रेरणा देणारी पोस्ट तो फेसबुकद्वारे दिल्लीसह देशभरातील इतर मोठ्या शहरांमधील त्याच्या मित्रपरिवाराला देत होता. त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना इसिसमध्ये येण्याकरिता तो उद्युक्त करीत होता.मुद्दबीरपाठोपाठ कौसा भागातील फरहान शेख यालाही ‘इसिस’मध्ये कार्यरत असल्याच्या संशयातून एनआयएने दिल्लीतून अटक केली. सौदीमध्ये गेल्यानंतर संगणक दुरुस्तीची नोकरी करणारा फरहान इसिसच्या जाळ्यात कधी ओढला गेला, हे त्याचा सांभाळ करणाऱ्या मेहरुन्निसा शेख या त्याच्या आजीलाही कळले नाही. शांत, एकाकी राहणारा फरहान फारसा कोणामध्ये मिसळत नव्हता. मुद्दबीर आणि फरहानच्या वागणुकीत बरेच साम्य होते. प्रचंड धार्मिक, एकलकोंडेपणा, शांत आणि कोणामध्येही न मिसळणारा स्वभाव. म्हणजेच धार्मिकतेच्या नावाखाली या समाजाची माथी भडकवायची आणि देशविघातक कृत्य करण्याचे ईप्सित साध्य करायचे, हेच काम ‘इसिस’च्या नेत्यांकडून केले जाते.केवळ इसिसचेच संशयित नव्हे, तर यापूर्वीही हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोएबाचेही कट्टर अतिरेकी २००० मध्ये या भागातून पकडले गेले आहेत. अबू हमझा आणि अबू सैफुल्ला या लष्कर-ए-तोएबाच्या दोघा कट्टर अतिरेक्यांचेही मुंब्य्रातच वास्तव्य होते. त्यांनाही त्या वेळी घोडबंदर भागातून ठाणे शहर विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्ता घुले यांच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून चार लोडेड मॅगझीनसह दोन एके-४७ रायफल, ९ हॅण्ड गे्रनेड या शस्त्रसामग्रीसह काही नकाशे आणि काही रोकड हस्तगत केली होती. मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आरएसएस सरसंघचालक सुदर्शन यांना ‘फिदाइन’ (आत्मघातकी बॉम्ब) ने उडवून देण्याची त्यांची योजना होती. त्यानंतर, हिजबुल मुजाहिद्दीनच्याही चार कट्टर अतिरेक्यांना २००१ मध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ इम्रान या आणखी एका कट्टर अतिरेक्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दीड किलो आरडीएक्स मिळाले होते. विमान अपरहरण प्रकरणात तो वॉण्टेड होता. एका माजी नौदल अधिकाऱ्याच्या संपर्कातून तोही मुंब्य्रात वास्तव्याला आला होता. एका दहशतवाद्याला अटक झाल्यानंतर थेट वागळे इस्टेट पोलीस ठाणे उडवण्याची धमकीही पोलिसांना आली होती. ‘सिमी’ या देशविघातक कृत्ये करणाऱ्या संघटनेच्या कारवाया येथून झाल्या होत्या. मुंब्रा येथे ड्रग्जचीही मोठ्या प्रमाणात तस्करी होते. याच भागातून १५ वर्षांपूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक काशिनाथ कचरे यांच्या पथकाने अडीच लाखांचे ५० किलो चरस दोन कोटींचे ब्राउन शुगर पकडले होते. त्यानंतर, एमडी पावडरची विक्री करणाऱ्या अनेकांना या भागातून अटक झाली आहे. मुंब्रा परिसरात नोव्हेंबर २०१४ ते मे २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एमडी पावडर मोठ्या प्रमाणावर आढळली. या भागातील तरुणतरुणी मोठ्या प्रमाणात एमडीच्या आहारी गेल्याने अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे इतके भयंकर परिणाम असूनही एमडीचा मादक पदार्थांमध्ये समावेश नसल्यामुळे पोलीस केवळ कलम ३२८ नुसार कारवाई करीत होते. (या कलमानुसार जास्तीतजास्त १० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. पण, एनडीपीएसच्या कलमांचा समावेश नसल्यामुळे विकणाऱ्यांची जामिनावर सुटका होत होती.) हा धोका लक्षात घेऊन एमडीचा एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स अ‍ॅक्टमध्ये समावेश करण्याची मागणी ठाणे-मुंब्य्रातील नागरिकांनी लावून धरली. मुंबई नार्कोटिक्स ब्युरो आणि दहशतवादविरोधी पथकानेही याच मागणीचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठवला. फेब्रुवारी २०१५ मध्ये अखेर केंद्र सरकारने एमडीचा एनडीपीएस (मादक पदार्थ) कायद्यात समावेश केला. (या कायद्यातही १० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, आरोपीला जामीन होत नाही.) पोलिसांनी नागरिकांच्या साह्याने मोहीम उघडल्याने व्यसनांना आळा घालण्याचे प्रयत्न यशस्वी झाले.महाराष्ट्रात या कायद्यानुसार पहिलीच कारवाई ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने केली. उपनिरीक्षक अमोल वालझडे यांनी मुंब्य्रातून हाजी (२४) या एमडीविक्रेत्याला २०१५ मध्ये अटक केली. त्यानंतरही सुमारे ७० ते ८० जणांना मादक पदार्थांची विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे. बऱ्याच प्रमाणात यावर नियंत्रण आले असले, तरी अजूनही एमडी, कोकेन आणि इफेड्रीन या अमली पदार्थविक्रेत्यांचे जाळे या भागात पसरल्यामुळे त्यांचे मोठे आव्हान पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकांना आहे.‘इसिस’चा मुख्य धोकामुंब्य्रातील बहुतांश नागरिकांत अशिक्षितता, अंधश्रद्धा अधिक आहे. कुटुंबनियोजनाच्या अभावामुळे वाढती कुटुंबसंख्या, त्यातून निर्माण होणारी बेकारी, रोजगार किंवा स्वयंरोजगाराचा अभाव आहे. एखादा गैरप्रकार दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती तसेच गैरकृत्य करणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी समाजाची एकी अशा अनेक कारणांमुळे येथील तरुण गैरमार्गांकडे किंवा देशविघातक कृत्याकडे ओढले जातात. ‘इसिस’ने भारतात फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपले जाळे पसरवले आहे. जिहादी झाल्यास ‘जन्नत’ मिळेल. इसिसमध्ये सहभागी होणे म्हणजेच जिहाद असा गैरसमज पसरवून गरीब तसेच उच्चशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढले. या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभनेही दिली जातात. शाळा, महाविद्यालयांतून ‘तकरीब’ हवेभिवंडीत वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी मौलाना आणि इमामांच्या मदतीने मशिदी, मदरसे आणि शाळा तसेच महाविद्यालयांतून ‘तकरीब’ अर्थात प्रवचनांद्वारे दहशतवादविरोधी पथक आणि पोलिसांकडून योग्य मार्गदर्शन केले होते. इसिससारख्या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रलोभनांना तरुणांनी बळी न पडण्याचे तसेच खऱ्या इस्लाम धर्माची ओळख आणि त्याची शिकवण मौलानांमार्फत दिली जावी. तरुणांना दहशतवादासाठी कसे प्रवृत्त केले जाते, त्यापासून कोणते धोके आहेत, आधी यामध्ये कोणकोण पकडले गेले, त्यांचे काय परिणाम झाले, अशा प्रकारचे उद्बोधन एटीएस, पोलीस आणि शिक्षकांनी करणे नितांत गरजेचे आहे. फेसबुक तसेच इंटरनेट हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे, फेसबुक अकाउंटवरूनही तरुणतरुणींशी संपर्क साधून त्यांनी कोणाला ‘लाइक’ आणि ‘अनलाइक’ करावे, त्याचेही धडे दिले जावेत. केवळ अतिरेकी कारवायाच नव्हे, तर एमडी पावडरच्या आहारी जाऊन तरुणवर्ग कसा वाममार्गाला लागतो. त्याचे दुष्परिणाम, त्यांना सांगितले पाहिजेत. इसिसने भारतातून अतिरेक्यांची भरती करण्याबाबतच्या सुरू केलेल्या हालचालींची माहिती देऊन जिहादचा नेमका अर्थ, इस्लामची खरी ओळख, इस्लाम हिंसेची शिकवण देत नाही, कोणत्याही महिलेचे संरक्षण करणे, जातीय सलोखा राखणे, गरजूंना मदत करणे हा खरा जिहाद असल्याचे मौलानांकडून तकरीबद्वारे पटवून दिले जावे. कोम्बिंगला विरोध कशासाठी?साधारण दोन वर्षांपूर्वी मुंब्रा-कौसा भागांत ठाणे पोलिसांनी एका माहितीच्या आधारे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग आॅपरेशन घेण्याचा निर्णय घेतला होता. हे आॅपरेशन सुरू होताच पोलिसांना विरोध झाला. जर एखाद्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन होत असेल, तर त्याला स्थानिकांनी विरोध का करावा? असे करून अनिष्ट प्रवृत्तींना आपण अप्रत्यक्षपणे संरक्षण तर देत नाही ना, याचाही येथील रहिवाशांनी विचार करायला हवा. या भागात आपल्याला पूर्ण संरक्षण मिळेल, याची खात्री असल्यानेच असे संशयित मुंब्रा भागात अगदी सहज आणि बिनधास्तपणे वास्तव्य करतात. ते पकडले गेल्यानंतर मात्र संपूर्ण मुंब्रा-कौसा पुन्हा बदनामीच्या छायेखाली येतो.
खबऱ्यांचे नेटवर्क वाढवावेकेवळ स्थानिक रहिवाशांवर अवलंबून न राहता पोलीस, आयबी, सीबीआय, एटीएस आणि गुन्हे अन्वेषण विभागाने या भागात आपले नेटवर्क वाढवले पाहिजे. अमली पदार्थांची तस्करी किंवा नामचीन गुंडांवर कारवाई येथवर मर्यादित न राहता त्यापुढे जाऊन सर्व बाजूंनी या भागातील सर्वेक्षण आणि पाहणी झाली पाहिजे. त्याला लोकप्रतिनिधी, इमाम, मौलाना आणि ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना मदत केली पाहिजे. ‘सर्व्हिस फंड’ म्हणून पोलिसांना खबऱ्यांसाठी जो निधी मिळतो, त्याचा कितपत वापर केला जातो, हाही एक संशोधनाचा भाग आहे. अनेक नामचीन गुंड किंवा अतिरेक्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना त्यांची बक्षिसीच दिली जात नाही. काही अधिकारी पदरमोड करून अशा खबऱ्यांची मर्जी राखतात. शासनाकडून मिळालेला हा निधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अन्यत्र न वळवता खबऱ्यांसाठीच खर्च करावा. असे लाखो रुपये पडून असतात. मग, आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत खबऱ्यांना ते दिल्यास त्याचा नक्कीच सकारात्मक बदल दिसल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांचीही जबाबदारी खूप मोठीकेवळ पोलिसांवरच विसंबून न राहता, एखादा अतिरेकी पकडला गेल्यानंतरही ‘बघ्या’ची भूमिका न घेता स्थानिक रहिवाशांनी संशयितांची माहिती देण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या मुलांचे मोबाइल, फेसबुक अकाउंट, इंटरनेट, टॅब यांची अधूनमधून चौकशी केली पाहिजे. ते कोणते टीव्ही चॅनल पाहतात, कोणाच्या संपर्कात आहेत, कोणाचा त्यांच्यावर प्रभाव आहे, त्यांच्याकडे वाहने आणि पैसे कोणी दिले, याचीही चाचपणी पालकांनी केली पाहिजे. भाडेकरूंवर, संशयितांना आसरा देणाऱ्यांवर नजर हवीया भागात येणारे भाडोत्री किंवा येणाराजाणारा नवखा कोण किंवा संशयितांना आसरा देणारे कोण आहेत, याची खात्री झाली पाहिजे. वाहने पुरवणारे आणि इस्टेट एजंटची भूमिका यात महत्त्वाची आहे. अशा अगदी छोट्या गोष्टींचीही माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलिसांनीही त्याची तितक्याच गांभीर्याने पडताळणी करावी. तसेच योग्य संस्कार मुलांवर रुजवले आणि कोणत्याही आमिषाला कोणीही बळी पडले नाही, तर मुंब्य्राला जो विनाकारण डाग लागला आहे, तो सहज पुसला जाऊ शकतो. हे मात्र तितकेच खरे आहे.