शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक यांचे निधन

By admin | Updated: April 29, 2015 01:16 IST

सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता भास्कर उर्फ बिंबा मोडक यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

पुणे : सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता भास्कर उर्फ बिंबा मोडक यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. शांताबार्इंनी दामूअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर’ नाटक कंपनीच्या माध्यमातून १९४९ मध्ये ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. या नाटकातील आनंदीबाईची त्यांची भूमिका खूप गाजली. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरूवात केली. संगीत नाटकातील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. संगीत विद्याहरण ( देवयानी), संगीत स्वयंवर (रूख्मिणी), संगीत सौभद्र (सुभद्रा), संगीत द्रौपदी (द्रौपदी), संगीत एकच प्याला (सिंधू), संगीत भावबंधन, (लतिका), संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर, पंडितराव तरटे यांच्या नाटक कंपनीमधील नाटकांमध्ये कामे केली. यामध्ये छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. रंगभूमीबरोबरच चित्रपटांमध्येही त्यांच्या अभिनयाचे दर्शन रसिकांना घडले. ‘चूल मूल’, ‘ऊन-पाऊस,’ ‘इन मिन साडे तीन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखविली. राज्य सरकारतर्फे १९८० मध्ये त्यांना मराठी नाटक शताब्दी महोत्सवामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे महापालिकेसह अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.