शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

वाहनांचे आरसी बुक मिळणार पुन्हा स्मार्ट कार्डमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 12:09 IST

सोलापूर दि ५ :   वाहनांचे आरसी बुक आता पुन्हा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मिळणार आहे. मात्र यावेळेस या स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.   

राजकुमार सारोळे : आॅनलाइन लोकमतसोलापूर दि ५ :   वाहनांचे आरसी बुक आता पुन्हा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मिळणार आहे. मात्र यावेळेस या स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.   परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत आरटीओंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ कार्यालयात वाहन परवाना वितरित करण्यात येणाºया अडचणींवर चर्चा झाली. आरटीओ कार्यालयाने वाहन परवाना काढण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू केल्यापासून चांगला प्र्रतिसाद मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना सुविधा केंद्र उपलब्ध होत नाही. त्यासाठी आरटीओ कार्यालयात एक सुविधा केंद्र स्थापन करावे, अशी सूचना अधिकाºयांनी केली. वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा कंपनीबरोबरचा करार संपला होता. त्यामुळे पेपर स्वरूपात आरसी बुक देण्यात येत होते. वाहनधारकांना पेपर स्वरूपातील आरसी बुक सांभाळणे अवघड झाले होते. तसेच अनेक वेळा आरटीओ कार्यालयात असे कागद उपलब्ध न झाल्याने पेपर आरसी वितरणाला सहा महिने विलंब होत होता. आरसी बुक किमान पूर्वीप्रमाणे पुस्तक स्वरूपात द्यावे, अशी मागणी होत होती.   पूर्वीचा ठेका असलेल्या कंपनीबरोबर आता नव्याने करार करून एक सप्टेंबरपासून आरसी बुक स्मार्ट स्वरूपात उपलब्ध केले जाईल, असे आयुक्त गेडाम यांनी सांगितले. मात्र यावेळेस ठेकेदाराबरोबर स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. पूर्वी वाहनधारकांकडून स्मार्ट कार्ड आरसीसाठी ३५0 रुपये फी आकारली जात होती. आता मात्र दोनशे रुपयांत स्मार्ट आरसी दिले जाईल. यात ठेकेदाराला ५४.७२ रु. तर उर्वरित रक्कम शासनाला जमा होईल. सोलापूर कार्यालयात स्मार्ट कार्ड वितरणाची यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.