शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहने, चालकांची संगणकीय तपासणी

By admin | Updated: April 20, 2015 03:29 IST

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्रास वाहन चालवण्याचे परवाने दिले जात होते. पुण्यातील भोसरी येथे कॉम्प्युटराईज ट्रॅकवर वाहन चालकाची परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यावर ४० टक्के लोक नापास होऊ लागले आहेत

संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्रात आतापर्यंत सर्रास वाहन चालवण्याचे परवाने दिले जात होते. पुण्यातील भोसरी येथे कॉम्प्युटराईज ट्रॅकवर वाहन चालकाची परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यावर ४० टक्के लोक नापास होऊ लागले आहेत. त्याचबरोबर नाशिक येथे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅकवर वाहनांची तपासणी सुरु केल्यावर अनेक वाहने चालवण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढे वाहनाची आणि चालकांची केवळ संगणकाद्वारे तपासणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यामुळे अपघात कमी होतील व भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.वाहन चालवण्याचा परवाना काढायचा तर तेथील अधिकारी आणि एजंट यांच्या संगनमताचा अनुभव येतो. एखादी व्यक्ती वाहन चालवण्याचा परवाना काढायला गेली तर बरेचदा त्याला कोणकोणती कागदपत्रे सादर करायची, याची एकत्र माहिती दिली जात नाही. चार-पाच वेळा खेटे मारल्यावर हेच काम एजंटमार्फत करण्याकरिता सुचवले जाते. एजंटमार्फत गेलेल्यांची वाहन परवाना देण्यापूर्वी बरेचदा परीक्षा घेतली जात नाही किंवा घेतली तरी जुजबी स्वरुपाची असते. अशा पद्धतीने महिनाभरात वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो. पुणे येथील भोसरीत कॉम्प्युटराईज टेस्ट ट्रॅक सुरु केला आहे. येथे परीक्षा  देण्याकरिता आलेल्या व्यक्तीने वाहन चालवल्यावर कॉम्युटर तो पास की नापास झाला ते ठरवतो. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत ४० टक्के लोकांना नापास ठरवण्यात आले. परिवहन विभागाने वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेतील मानवी सहभाग पूर्णत: थांबवून या क्षेत्रातील भ्रष्टाचार व पर्यायाने अपघाताची संभाव्य शक्यता थांबवण्याकरिता सर्वत्र कॉम्प्युटराईज टेस्ट ट्रॅक सुरु करण्याचे ठरवले आहे.प्रत्येक वाहनाची दरवर्षी तपासणी करणे बंधनकारक आहे. व्यवस्थित तपासणी करून वाहन रस्त्यावर धावण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र देणे त्याकरिता लागणारा वेळ लक्षात घेता अशक्य असल्याचे हे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे मत आहे. त्यामुळे केवळ वरवर पाहून ही प्रमाणपत्रे दिली जातात. ९० टक्के अपघातांमध्ये वाहनाची खराब स्थिती हेच कारण असते. नाशिक येथे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅक प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आला आहे. ४५ मिनिटांत एका वाहनाची तेथे तपासणी होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)ने त्यांच्याकडे असलेल्या जागांवर हे आॅटोमेटेड टेस्ट ट्रॅक उभारायचे असून सर्व वाहनांना त्याच ठिकाणी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले जाणार आहे.