शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घोषणा! वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 05:39 IST

काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला घेण्याचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला.

मुंबई - वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे. 

काय म्हणाले अनिल अग्रवाल?वेदांता-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये उदा. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इ. गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला घेण्याचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे असल्यानं व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली. ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतात इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल असं सांगत त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचे स्पष्ट म्हटलं. 

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोलाकंपनीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की,  वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी अनिल अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मात्र मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? हा माझा या नेत्यांना प्रश्न आहे. स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर असं सांगत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस