शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वसई ग्रामीण आजही उपेक्षितच

By admin | Updated: August 15, 2016 04:04 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

सुनील घरत,

पारोळ/वसई- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रस्ते तसेच शासनाकडून येणाऱ्या योजना निव्वळ कागदावरच आहेत की काय, अशी परिस्थिती आहे. सरकारी बाबू आणि राजकीय नेत्यांच्या बनवेगिरीमुळेचे ही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.वसई महानगरपालिकेचा पूर्व भाग हा डोंगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती आहे. हातावर पोट ही या भागाची जीवन पद्धती. पण या भागाकडे राजकीय नेत्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विकास फक्त कागदावरच दिसत आहे. पालघर जिल्ह्यात शासन जि.प. शाळा डिजिटल करत असताना तिल्हेर परिसरातील शाळकरी मुलांना गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. गरीब मुलांनी फक्त गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे का? हा प्रश्न या भागातील पालकांसमोर आहे. या भागातील आरोग्य यंत्रणाही आजारी आहे. पारोळ, मांडवी, भाताणे या भागांत आरोग्य केंदे्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांना गळती लागल्याने गरीब रुग्णांना छत्री घेऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. पारोळ आरोग्य केंद्र तर भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. शासनाला चुना लावल्याचा आरोप या केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यावर आहे. या भागातील रस्ते वाहून गेल्याचे भाताणे, उसगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. जर गावांचा सातत्याने संपर्क तुटत असेल तर प्रशासन करते काय, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.>दुर्लक्षित धोरणाचे दुष्परिणामया भागातील गरीब विद्यार्थ्यांवर रस्त्याअभावी शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तानसा नदीवरील उसगाव, भेठे या पुलांची उंची कमी असल्यामुळे हे पूल पाण्याखाली जात असल्यामुळे अनेक वर्षांपासून आठआठ दिवस या गावांचा संपर्क तुटत आहे. या भागातील सुरक्षा यंत्रणेची ही बोंब आहे. पारोळ भागातील दुकानफोड्या, घरफोड्या करणाऱ्यांचा अजूनही तपास नाही. घराबाहेर या ठिकाणी पाणी पिण्याच्या विहिरीत विष टाकले. या गंभीर बाबीचाही तपास नाही. महसूल अधिकारीही शेतकऱ्यांपेक्षा जमीन दलालाच्या कामात मग्न, महिन्याला येणाऱ्या रेशनिंगचा पत्ता नाही अशा अनेक समस्या या भागात पाहायला मिळतात. सरकारे बदलली, लोकप्रतिनिधी बदलले, ग्रामपंचायत असलेल्या वसई-विरारची महानगरपालिका झाली, तरी पण वसई पूर्व भागाची अवस्था आजही बिकट आहे.