शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येणाऱ्या ४८ तासांत वरुणराजा बरसणार!

By admin | Updated: June 26, 2016 09:40 IST

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील काही भागातही जोरदार वृष्टी झाली. हमखास पावसाचा बेल्ट समजल्या जाणाऱ्या घाटमाथ्यावरचा पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्राच्या उत्तरी भागात, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील काही भागांत होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. २६ जून रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
 
मागील २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सवार्धिक १९२ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाली आहे. 
 
२५ जून सकाळी ६ पासून २६ जून रोजी पहाटे ३.२० पर्यंत नांदेड शहरात ३८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
 
ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कल्याण ३६.५, मुरबाड ३.८, भिवंडी ४३.१, शहापूर २४.३, अंबरनाथ ९.८ तर उल्हासनगर येथे शून्य पावसाची नोंद झाली आहे.
 
पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी वसई १०९, डहाणू ५१.१, वाडा ४४.३, जव्हार १०, मोखाडा १३, तलासरी २२.५ तर विक्र मगड येथे १७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे १२६ मिमी झाला. उर्वरित ठिकाणी वेंगुर्ला १०७, मालवण ९१, सावंतवाडी ९०, कुडाळ ६३, वैभववाडी २४, कणकवली २२ मि.मी. नोंद झाली.