शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वांद्र्यात नारायण राणेंचे वांदे, शिवसेनेचा भगवा फडकला

By admin | Updated: April 15, 2015 22:12 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तिस-या फेरीअखेर शिवसेनेच्या तृप्ती सावंत या आघाडीवर आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ -  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करत शिवसेनेने दिमाखदार विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा १९ हजार मतांनी पराभव करत मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा भगवा झेंडा रोवला आहे. 

शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने थेट नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत रंग भरला. एमआयएमचे रेहबार सिराज खान हे निवडणूक लढवत असल्याने या तिरंगी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

मातोश्रीच्या बालेकिल्ल्यात ही निवडणूक होत असल्याने शिवसेना व नारायण राणे या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसैनिक त्वेषाने प्रचारासाठी उतरले होते. तर नारायण राणेंनीही कुडाळमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली होती. मात्र या लढतीमध्ये शिवसेना यशस्वी ठरली असून तृप्ती सावंत या भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.  तृप्ती सावंत यांना ५२, ७११ मतं मिळाली आहेत. तर नारायण राणेंना ३३,७०३ मतं मिळाली असून एमआयएमचे रेहबर सिराज खान यांना १५,०५० मतं मिळाली आहेत. रेहबर यांचे डिपोझीट जप्त होण्याची नामूष्की एमआयएमवर ओढावली आहे.