शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्' बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 19:21 IST

मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मुंबई, दि. 10 - मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या या निर्णयावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून शिवसेना-भाजपाने हा प्रस्ताव मंजूर केला. भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी हा प्रस्ताव मांडला. 

आठवडयातून दोन दिवस शाळांमध्ये 'वंदे मातरम्'चे गायन होईल.  मनपा आयुक्त अजोय मेेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी हा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होईल. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होत असताना काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. अनेक मुस्लिमांचा वंदे मातरमच्या सक्तीला विरोध आहे. 

प्रसिद्ध वकिल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन आणि एमआयएमच्या आमदारांनी वंदे मातरमच्या सक्तीला विरोध केला आहे. मुंबई पालिकेत भाजपाने प्रत्येक पालिका शाळेत वंदेमातरम म्हणण्यात यावे, अशा ठरावाची सूचना आणली. विधीमंडळाप्रमाणे महापालिकेतही वंदे मातरमची मागणी भाजपाने केली होती. दोन वर्षांपूर्वीही मुंबई पालिकेत असा ठराव आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी यश मिळाले नव्हते. 

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिन साजरा केल्यानंतर पालिका शाळांमध्ये योगा, सुर्य नमस्कार, वंदे मातरम्ची सक्ती करण्याची मागणी भाजपाने केली होती. यावर मोठा वाद झाला होता. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील शाळांमध्ये वंदे मातरम् चे गायन बंधनकारक केल्यानंतर भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी पालिका शाळांमध्ये वंदे मातरम् बंधनकारक करण्याची मागणी केली होती. 

त्यासाठी पी वॉर्डचे नगरसेवक असलेल्या पटेल यांनी सूचना मांडली होती. 1998 मध्ये पराग चव्हाण शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी सुद्धा हीच मागणी केली होती. पण 2004 मध्ये तत्कालिन आयुक्तांनी अभिप्रायात ही सक्ती शक्य नसल्याचे म्हटले होते.