शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पश्‍चिम विदर्भातील लाखो जनावरांना रोग प्रतिबंधक लस

By admin | Updated: June 23, 2016 21:44 IST

पशुसंवर्धन विभागाची मोहीम; पावसाळ्यापूर्वी लसीकरणावर भर.

ब्रह्मनंद जाधव/बुलडाणापावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनांचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील लहान व मोठय़ा अशा १ लाख ७0 हजार ३९१ जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस देण्यात आली. पावसाळ्यात होणार्‍या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे या जनावरांचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. पावसाळ्यापूर्वी या मोहिमेत अमरावती विभागातील १ लाख ७0 हजार ३९१ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, बैल आदींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७ हजार ९४0 लहान, मोठय़ा जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात २ हजार २७३, वाशिम जिल्ह्यात २८ हजार २३२, बुलडाणा जिल्ह्यात ९७ हजार ५१५ व यवतमाळ जिल्ह्यात ३४ हजार ४३१ पशूंचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्‍यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात लाखो जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

या रोगांवर झाले लसीकरणपशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फर्‍या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येत आहे.

१ लाख ११ हजार गायी, म्हशींचा समावेशअमरावती विभागातील १ लाख ११ हजार २२४ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १ हजार ९४0, वाशिम जिल्ह्यात २७ हजार ३१३, बुलडाणा जिल्ह्यात ६४ हजार १४६ व यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार ८२५ गायी व म्हशींचे लसीकरण करण्यात आले आहे.

अमरावती विभागात झालेले लसीकरणजिल्हा             जनावरांची संख्याअमरावती           ७९४0अकोला               २२७३वाशिम              २८२३२बुलडाणा            ९७५१५यवतमाळ          ३४४३१एकूण              १७0३९१