शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:30 IST

मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या कविता अलदर हिच्या तीन दिवसांच्या बाळाला एक अनोळखी महिला लसीकरणाच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेली ती परत आलीच नाही.

- संतोष आंधळेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने सर्वच सरकारी रुग्णालयांच्या प्रसूती विभागातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची बैठक घेऊन नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करावे, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि या विभागातून बाहेर जाण्याचा आणि येण्याचा एकच मार्ग ठेवा, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या कविता अलदर हिच्या तीन दिवसांच्या बाळाला एक अनोळखी महिला लसीकरणाच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेली ती परत आलीच नाही. बाळाची चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कविता यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आणि बाळाला ताब्यात घेतले.    

या घटनेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची रविवारी दुपारी दूरदृश्यप्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसूती विभागातील सुरक्षेविषयी अधिक सजग राहण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. 

रुग्णालयांनी काय करावे? नवजात अर्भकाचे लसीकरण प्रसूती विभागातच करावे. प्रसूती विभागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी. विभागातून बाहेर येण्या-जाण्याचा मार्ग एकच असावा.आत ये-जा करणाऱ्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र नोंदणी वही ठेवावी.रुग्णालय पासचा अचूक वापर आणि कठोर तपासणी करण्यावर भर.

लवकरच सामायिक एसओपीवैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अशा घटना टाळण्यासाठी सामायिक मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली (एसओपी) जारी करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करणे सर्व सरकारी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात येणार आहे.

रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का? याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे.हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :hospitalहॉस्पिटल